esakal | वर्क फ्रॉम होममध्येही धुम्रपान कराता येणार नाही; कंपनीने लागू केला नियम
sakal

बोलून बातमी शोधा

Smoking

वर्क फ्रॉम होममध्येही धुम्रपान कराता येणार नाही; कंपनीने लागू केला नियम

sakal_logo
By
सुधीर काकडे

लोकांनी सार्वजनिक ठिकाणी धुम्रपाण (Smoking) करु नये या साठी प्रशानसनाकडून वेगवेगळे नियम आणि कायदे लागू केल्याचे आपण ऐकल असेल मात्र एखादी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी असा निर्णय घेत असेल तर ती सकारात्मक आहे. धुम्रपाण करणे ही गोष्ट हाणीकारक असून, त्यामुळे कॅंन्सर सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. मात्र धुम्रपाण करण्याचे व्यसन (Addiction) असलेली व्यक्ती सहजासहजि या व्यसनापासुन दूर जाऊ शकत नाही आणि आपले आरोग्य धोक्यात टाकते. जपानच्या ब्रोकरेज फर्म नोमुरा या कंपनीने धुम्रपान करण्यापासुन आपल्या कर्मचाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी नियम लागू केल्याचे समोर आले आहे.

जपानच्या ब्रोकरेज फर्म नोमुरा या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना धुम्रपान करण्यास सक्त मनाई केली आहे. ही सक्ती फक्त कर्मचारी ऑफिसमध्ये असतानाच नाही तर घरी असताना सुद्धा आहे. कोरोना महारामारीमुळे अनेक कर्मचारी आजही घरुन काम करता आहेत. मात्र या कंपनीने घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा कामाच्या वेळेमध्ये धुम्रपान करण्यास मनाई केली आहे. कंपनीने ऑक्टोबरपासुन हा नियम लागू करणार आहे.

हेही वाचा: दीर्घकालीन कोविडमधून बरे होण्यासाठी टिप्स

कंपनीचे प्रवक्ते योशिताका ओत्सू यांनी सांगितले की, कंपनी यासाठी कर्मचाऱ्यांवर कुठल्याच पद्धतिने निगराणी ठेवणार नाही. तसेच हा निर्णय फक्त कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले रहाले म्हणून घेण्यात आला असून, या नियमाचे उल्लंघन केल्यास कर्मचाऱ्यांना आकारला जाणार नाही. काम करण्यासाठी पोषक वातावरण असावे यासाठी कंपनीने हा नियम लागू केला आहे. विशेष म्हणजे धुम्रपान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षीस सुद्धा देते.

कंपनीमध्ये कर्मचारी ब्रेकमध्ये धुम्रपान करुन पुन्हा ऑफिसमध्ये आल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास होतो. ऑफिसमध्ये आल्यानंतर ४५ मिनीटांपर्यंत वास येतो. जपानच्या लोकांमधील धुम्रपानाचे प्रमाण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

loading image
go to top