Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

Longevity Secrets: जपानमध्ये १०० वर्षे जगण्याऱ्या लोकांचा आकडा १ लाखापेक्षा जास्त झालेला आहे! जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य नक्की काय आहे? पाहा 'हा' जपानी फिटनेस फॉर्म्युला....
Japan's Centenarian Population Surpasses 100,000 Milestone: Women Account for 87%

Japan's Centenarian Population Surpasses 100,000 Milestone: Women Account for 87%

esakal 

Updated on

Why Japan Has Over 100,000 Centenarians: दीर्घायुष्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या जपानमध्ये शंभर किंवा त्याहून अधिक वर्षे जगणाऱ्या नागरिकांच्या संख्येने नवा इतिहास रचला आहे. जपानच्या आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या १ सप्टेंबरच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील शतायुषी नागरिकांची संख्या पहिल्यांदाच १ लाख ७ हजार ६७७ वर पोहोचली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ७ हजार ९१४ शतायुषींची भर पडली असून, सलग ५६ व्या वर्षी ही संख्या वाढली आहे.

सध्या जपानची एकूण लोकसंख्या अंदाजे ११.९७ कोटी आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण शतायुषी लोकसंख्येमध्ये महिलांचे प्रमाण तब्बल ८७.६ टक्के आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com