Javed Jaffery: वयाची साठी गाठणारा जावेद जाफरी अजूनही फिट कसा? जाणून घ्या फिटनेस सीक्रेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jaaved Jaaferi

Javed Jaffery: वयाची साठी गाठणारा जावेद जाफरी अजूनही फिट कसा? जाणून घ्या फिटनेस सीक्रेट

Fitness Tips: विनोद करत वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे जावेद जाफरी. या अभिनेत्याने आज वयाची ५९ वर्षे पूर्ण केलीत. धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांना चाळीशीनंतर आजारपण, म्हातारपण आल्याची जाणीव व्हायला लागते. तेव्हा अशांनी जावेद जाफरीचं हे फिटनेस सीक्रेट एकदा जरूर वाचावं.

वाढत्या वयात फिटनेससाठी जावेद जाफरीचा खास सल्ला

जावेज जाफरीचं वय ५९ वर्षे असल्याचा तुम्हाला विश्वासच बसणार नाही. त्याच्या फिटनेसचं एक सीक्रेट म्हणजे त्याचा डान्स. (Exercise) माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत जावेदने सांगितले होते की, आपली रोजची लाईफ कितीही हेक्टिक असली तरी थोडा का होईना वेळ काढून तुम्ही तो स्वत:च्या आरोग्यासाठी द्यायला हवा.

फिट राहाण्यासाठी डान्स हा अत्यंत रंजक आणि सरळ साधा उपाय असल्याचं जावेद जाफरीचं मत आहे. त्याने तुमचा दिवसभऱ्याचा स्ट्रेसही दूर होण्यास मदत होते. एका अपघातात जावेदचा पायाला इजा झाली होती. मात्र डान्स करण्याची आवड त्याच्या अंगी आजही असल्याचे दिसून येते.

जावेदने माध्यमांशी बोलताना असेही सांगितले होते की, वाढत्या वयात फिटनेससाठी केवळ व्यायाम नाहीतर आहार देखील महत्वाचा आहे. वेळेत आहार घेतला नाहीतर तुमची प्रकृती बरोबर राहाणार नाही. तुम्हाला अनेक आजार जडतील आणि म्हातारपणही लवकर येईल.

हेही वाचा: वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

एकंदरीत फिट राहाण्यासाठी एका जागी बऱ्याच वेळ बसू नये. सतत हालचाल करत राहावी. तसेच आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. असे केल्यास तुम्ही वयाच्या कोणत्याही वर्षात फिट राहू शकता.