Joint Family : एकत्र कुटुंबात राहण्याचे 5 मोठे फायदे, कळल्यास तुम्ही विभक्त कुटुंबाचा विचारही करणार नाही

संयुक्त कुटुंबात राहणार्‍या लोकांबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या मनात कुटुंबातील सर्व सदस्यांप्रती आपुलकीची भावना असते
Joint Family
Joint Familyesakal

हल्ली न्यूक्लियर (विभक्त) फॅमिलीमध्ये राहण्याची क्रेझ वाढत चाचली आहे. अगदी ५० वर्षे मागल्या काळाचा विचार केला तरी आपले आजी आजोबा किंवा पणजोबा एकत्र कुटुंबात राहायचे. अगदी ६-८ मुलांचं कुटुंब एकत्रित गुण्यागोविंदाने राहायचे. मात्र आता नोकरीच्या, शिक्षणाच्या निमित्ताने गावाकडील माणसांचं शहराकडे स्थलांतर आणि नंतर तिथेच कुटुंब. त्यांमुळे कुटुंब वेगळी होतात.

आज जरी लोकांमध्ये न्यूक्लियर फॅमिलीमध्ये राहण्याची क्रेझ वाढत असली तरी संयुक्त कुटुंबाचे स्वतःचे अनेक फायदे आहेत. न्यूक्लियर (विभक्त) फॅमिलीमध्ये राहणारी मुले असोत किंवा ज्यांना एकांत आवडते, अशा लोकांना कोणत्याही प्रकारची बंधनं सहन होत नाहीत. दुसरीकडे, संयुक्त कुटुंबात राहणार्‍या लोकांबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या मनात कुटुंबातील सर्व सदस्यांप्रती आपुलकीची भावना असते. जाणून घेऊया संयुक्त कुटुंबात राहण्याचे काय फायदे आहेत ते.

संयुक्त कुटुंबाचे फायदे

आर्थिक समस्यांपासून दूर राहता

संयुक्त कुटुंबात राहणा-या लोकांचा सर्वात मोठा फायदा हा आहे की त्यांना गरज पडल्यास इतरांकडून पैसे घ्यावे लागत नाहीत. अशा लोकांच्या बहुतेक आर्थिक समस्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने सोडवल्या जातात. तर एकटे राहणाऱ्या लोकांच्या घरात किंवा विभक्त कुटुंबात फक्त एकच व्यक्ती किंवा जोडीदार संपूर्ण घराच्या खर्चाचा भार उचलते.

मुलांची काळजी घ्यायला बरेच लोक असतात

संयुक्त कुटुंबाची दुसरी चांगली गोष्ट म्हणजे अशा कुटुंबात राहणाऱ्या मुलांना आजी-आजोबांच्या प्रेमाबरोबरच उत्तम संगोपनही मिळते. त्यांच्यासोबत राहिल्याने त्यांना जीवनाचे चांगले धडेही मिळतात. मुलांना लहानपणापासूनच कौटुंबिक मूल्ये कळतात.

Joint Family
Family Trip: फॅमिली ट्रिपचा विचार करताय ? असे करा प्लॅनिंग आणि वाचवा अतिरिक्त खर्च...

मुले मानसिक समस्यांपासून दूर राहतात

न्यूक्लियर फॅमिलीमध्ये राहणाऱ्या मुलांना स्वतःच्या कुटुंबात राहताना अनेकदा एकटेपणा जाणवतो. त्यामुळे त्यांच्या वागण्यात अनेकदा चिडचिडेपणा आणि राग दिसून येतो. अशी मुलं मित्र आणि पालकांसोबतही विचित्र वागू लागतात. तर ही समस्या संयुक्त कुटुंबात होत नाही. आई-वडील तिथे काम करत असूनही मुले आजी-आजोबांसोबत आपले विचार मांडतात. (Lifestyle)

कुटुंबाचा पाठिंबा मिळेल

संयुक्त कुटुंबात राहणे ही तुमच्या कुटुंबाची सर्वात मोठी आधार प्रणाली बनते. जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड देण्यासाठी तुमचे संपूर्ण कुटुंब एकजुटीने उभे असते. तुम्हाला आवश्यक असलेला कोणताही सल्ला किंवा मत असो, तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. (Family)

Joint Family
Google Family Link : मुलांना स्मार्टफोन द्यायला भीती वाटतेय? आता चिंता सोडा! गुगलचं हे फीचर ठरेल फायद्याचं

योग्य सल्ले

जीवनात कुठलंही मोठं पाऊल उचलण्यासाठी किंवा आयुष्यातील महत्वाचे मोठे निर्णय घेण्यासाठी अनुभवी माणसांच्या सल्ल्याची गरज असते. अशात मुलांना त्यांच्या जीवनात पुढे जाण्यासाठी कुटुंबातील अनुभवी व्यक्तींचे सल्ले कामी येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com