Summer Shopping: उन्हाळ्यात खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी, डिहायड्रेशनपासून मिळेल आराम

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्हाला उन्हाळ्यात खरेदी करण्यात मदत करतील.
Summer Shopping
Summer Shoppingsakal

मे महिन्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. या नव्या सीझनमध्ये नवीन कपडे, अॅक्सेसरीज, होम डेकोर यासारख्या वस्तू लोक खरेदी करतात. उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा धोका असल्याने जास्त वेळ खरेदी करणे कठीण होऊ शकते. खरेदी करताना एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जाणे हे खूप कठीण असते.

चला, आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्हाला उन्हाळ्यात खरेदी करण्यात मदत करतील. याला फॉलो केल्याने तुम्ही डिहायड्रेशनच्या समस्येपासून वाचाल.

Summer Shopping
Hair Care Tips: काय सांगता! चहा पत्ती आहे केसांसाठी सर्वोत्तम, वाचा कसा करणार हा घरगुती उपाय

आरामदायक कपडे घाला

जर तुम्ही कडक उन्हात खरेदीला जाण्याचा विचार करत असाल तर यासाठी तुम्ही टाईट किंवा अनकंफर्टेबल कपडे घालू नका. म्हणूनच आरामदायक आणि हलके कपडे घालणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यात सुती आणि लिनेन फॅब्रिकचे कपडे घालावेत. तसेच, सनग्लासेस, टोपी घाला आणि बाहेर पडण्यापूर्वी 30 मिनिटे अगोदर सनस्क्रीन लावा.

पाण्याची बाटली ठेवा

पाण्याची बाटली तुमच्या पाकिटाइतकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना पाण्याची बाटली घेऊन जाण्यास विसरू नका. खरेदी करताना निर्जलीकरण जाणवू नये, म्हणून थोडे-थोडे पाणी प्या.

सॅलड ठेवा

भूक लागली असेल तर बाजारातून तळलेले स्नॅक्स घेण्याऐवजी सॅलड घरून घेऊन जाणे चांगले. भरपूर भाज्या एकत्र चिरून आणि लिंबाचा रस किंवा मेयोनीज घालून तुम्ही ताजे सॅलड बनवू शकता.

तुमचा सॅलड प्रोटीनयुक्त बनवण्यासाठी तुम्ही त्यात सोया चंक्स किंवा पनीर देखील घालू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भाज्यांऐवजी फ्रूट सॅलडही ठेवू शकता. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला हायड्रेट ठेवू शकाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com