Kitchen Hacks : घरात झालाय मुंग्याचा सुळसुळाट? हे उपाय करा मुंग्या स्वत:च घर सोडून जातील!

मुंग्यांना पळवून लावायला मदत करेल तिखट मीठाचा मसाला
Kitchen Hacks
Kitchen Hacks esakal

Kitchen Hacks : एखादा गोड पदार्थ खाताना जमिनीवर पडला तर त्याठिकाणी काही वेळानंतर लगेच मुंग्या आलेल्या दिसतात. त्यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात मुंग्यांच्या रांगा लागताना दिसतात. कालांतराने या मुंग्यांचा वावर एवढा वाढतो, की नंतर या मुंग्या बिछान्यात आणि कपड्यात दिसू लागतात. अशावेळी या मुंग्या तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. घरात मुंग्यांची दहशत केवळ मानसिकच नाही तर धार्मिक दृष्टिकोनातूनही वाईट मानली जाते.

Kitchen Hacks
Kitchen Hacks: लोणच्यात जास्त मीठ पडलयं? वापरा या टिप्स

बहुतेक वेळा मुंग्या घरात आणि बागेत तळ ठोकून राहतात. त्यांच्या चाव्यामुळे वेदना होतात, तर काहींना ऍलर्जी देखील होते. लोक कीटकनाशके वापरून शक्य तितक्या लवकर त्यांची सुटका करतात, परंतु प्रत्यक्षात ते लहान मुले, पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक आहे. त्याचमुळेच मुंग्या बाहेर घालवण्यासाठीचे उपाय काय आहेत ते पाहुयात.  

Kitchen Hacks
Kitchen Hacks: लोणच्यात जास्त मीठ पडलयं? वापरा या टिप्स

साबण आणि पाणी

एका भांड्यात पाणी आणि डिश वॉश बार घ्या. त्या पाण्यात साबण विरघळला की ते पाणी एका बाटलीत भरुन ठेवा. जेव्हा तूम्हाला मुंग्या दिसतील तेव्हा हे पाणी त्यांच्यावर शिंपडा.

व्हाईट व्हिनेगर आणि पाणी

मुंग्यांना व्हिनेगर आवडत नाही. पाण्यासोबत व्हिनेगर वापरून तुम्ही कीटकनाशक बनवू शकता. अर्धे पाणी आणि अर्धे व्हाईट व्हिनेगरचे एका स्प्रे बाटलीत घाला. वेळोवेली ते मुंग्यांवर फवारा.

मुंग्यांना व्हिनेगर आवडत नाही
मुंग्यांना व्हिनेगर आवडत नाहीesakal
Kitchen Hacks
Kitchen Hacks: अंडे उकडण्याची अन् सोलण्याची खास पद्धत; एकही अंडे फुटणार नाही

लिंबूचा रस

व्हिनेगरच्या ऐवजी लिंबाचा रस आणि पाणी मुंग्यांना दूर ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे. एक भाग लिंबाचा रस तीन भाग पाण्यात मिसळून द्रावण तयार करा आणि स्प्रे बाटलीत भरा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते तुमच्या अंगणातील मुंग्या घालवण्यासाठी हा उपाय फायदेशीर आहे.

बोरिक ऍसिड  

बोरिक ऍसिड हे मुंग्यांसाठी विष आहे. ते खाल्ल्यानंतर मुंग्या मरतात. जिथे मुंग्या जास्त दिसतात, त्या ठिकाणी तुम्ही ते शिंपडू शकता. आपण इच्छित असल्यास आपण बोरिक ऍसिडचा सापळा देखील बनवू शकता.

लाल तिखट

घरात जर जास्त मुंग्यांचा वावर झालेला असेल तर तुम्ही लाल तिखटचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही थोडी लाल तिखट घ्या आणि ज्या जागी मुंग्या असतील तिथे टाका. असं केल्याने थोड्यावेळातच सर्व मुंग्या जागेहून नाहीशा झालेल्या दिसतील. तसंच पुन्हा तुम्हाला मुंग्यांचा त्रास होणार नाही.

Kitchen Hacks
Kitchen Hack : नॉन-स्टिक भांड्यांनाही चिकटतंय अन्न? मग धुताना 'या' 5 ट्रिक्स ट्राय करा

मीठ

मीठ मुंग्यांना घालवण्यासाठी सर्वात चांगला मार्ग आहे. यासाठी पाण्यात मीठ घालून, पाणी चांगले उकळवा. हे पाणी थंड झाल्यावर एका स्प्रेअरमध्ये भरा. त्यानंतर ज्या ठिकाणी मुंग्या दिसतील तिथे हा स्प्रे करा. याने मुंग्या मरतील आणि पुन्हा येणार नाहीत.

Kitchen Hacks
Kitchen Hacks : चपातीच्या काळवंडलेल्या तव्याकडे बघू वाटतं नाहीय? मिनिटात करा तवा चकचकीत!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com