
लय भारी! इवलुशी मुंगी शोधणार कॅन्सरच्या पेशी
कोणत्याही आजाराचे निदान करण्यासाठी चाचणी करावी लागते. मशिनच्या साहाय्याने चाचणी केल्यावर तुम्हाला तुमचा आजार किती खोलवर गेलाय हे कळतं. कॅन्सरचं (Cancer) निदान झाल्यावर तुमच्या शरीरात त्यामुळे किती हानी झाली आहे हे कळण्यासाठीही डॉक्टर विविध चाचण्या करायला सांगतात. त्यानुसार कॅन्सरच्या पेशी आहेत का? असल्या तर कोणत्या स्टेजचा कॅन्सर आहे ते समजण्यास मदत होते. पण आयसायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार चक्क इवलुशी मुंगी तुमच्या शरीरातील कॅन्सरच्या पेशी शोधू शकते. इतकंच नाही तर ज्याप्रमाणे कुत्रा वासाने गोष्टी शोधू शकतो त्याप्रमाणे मुंगीशी वासानेच हा शोध लावू शकते,असेही अभ्यासात आढळून आले आहे.
हेही वाचा: उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने होतात ६ फायदे!

ant
पेशी शोधण्यासाठी मुंग्या योग्य
फ्रेंच नॅशनल फॉर सायंटिफिक रिसर्चने याविषयी अभ्यास केला आहे. याविषयी शास्त्रज्ञ म्हणाले की, योग्य प्रशिक्षण दिल्यावर काही काळानंतर जे किटक रोजच्या जीवनात सुंगधाचा उपयोग करतात. या मुंग्या माणसांच्या शरीरातील निरोगी पेशींमधून कॅन्सरच्या पेशी शोधू शकतात. आयसायन्समध्ये प्रकाशित झालेल्या पेपरमध्ये संशोधकांनी काढलेल्या निष्कर्षात काही गोष्टी दिसून आल्या. माणसाच्या कॅन्सरमधील बायोमार्करचा शोध घेण्यासाठी इतर जनावरांच्या तुलनेत मुंग्याचा वापर करणे हे सोपे आणि फायदेशीर आहे, असे म्हटले आहे.
हेही वाचा: कॅब चालक निघाला Uberचा मालक!

Cancer
शास्त्रज्ञांनी मुंग्या कशाप्रकारे शोध घेऊ शकतात, तेही सांगितले आहे. अभ्यासादरम्यान संशोधकांनी साखरेच्या सोल्युशनचा वापर करून मुगींला येणाऱ्या गंधाचे परिक्षण केले. काही मुंग्या साखरेच्या वासामुळे तिथपर्यंत गेल्या. कारण या मुंग्यांना त्यासाठी ट्रेनिंग देण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, या मुंग्या दोन वेगळ्या कॅन्सर पेशींमधील अंतर जाणण्यास सक्षम असल्याचे आढळून आले. संशोधकांच्या मते, मुंग्या नशा येणारे अंमली पदार्थ, विस्फोटक आणि काही आजारांचा गंध ओळखू शकतात. कुत्र्याप्रमाणेच त्यांची गंधक्षमता चांगली असते. संशोधकांच्या मताप्रमाणे, मुंग्या या विविध गंध ओळखू शकतात. जसं की, नशेचे पदार्थ, विस्फोटक पदार्थ किंवा काही आजार. श्वानांप्रमाणे त्यांची गंध घेण्याची क्षमता उत्तम असते.
हेही वाचा: आम्हाला मुलबाळ नकोच... का म्हणतात महिला असं!
Web Title: Ants Can Detect Cancer Cells In Human Body Reserch Says
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..