Kitchen Hacks: लोणच्यात जास्त मीठ पडलयं? मग या टिप्स ट्राय करून बघा

स्वयंपाक करताना मीठ जर जास्त झाले तर एखाद्या वेळी चालूनही जाते. पण जर लोणच्यात मीठ जास्त असेल तर त्याचे काय करायचे?
Kitchen Hacks: लोणच्यात जास्त मीठ पडलयं? मग या टिप्स ट्राय करून बघा
Updated on

जेवण बनवण्यासाठी खूप वेळ आणि शक्ती लागते. पण त्यात मीठ नसेल तर अन्नाची चव वेगळी लागते. अशा परिस्थितीत आपण त्यात मीठ घालून चवदार बनवू शकतो. पण जेवणात मीठ जास्त पडले तर गोष्टी अवघड होतात.

लोणचं म्हटंल कि तोंडाला पाणी सुटते. काहींना लोणच खायची इतकी सवय असते की नियमित जेवणात लोणचं नसेल तर जेवल्याचे समाधान वाटंत नाही. आंबा, फणस, मिरची, गाजर, कोबी, लिंबू, मुळा याची तर चवच भारी असते. उन्हाळ्याच्या हंगामात तर प्रत्येक गृहिणी घरी लोणचे बनवते. पण हे बनवताना कधी कधी बिघडू शकते. जसं कि मीठ जास्त पडणे.

स्वयंपाक करताना मीठ जर जास्त झाले तर एखाद्या वेळी चालूनही जाते. पण जर लोणच्यात मीठ जास्त असेल तर त्याचे काय करायचे? हा प्रश्न गृहीणींना पडतोच. कारण नियमित स्वयंपाक करणे हे वेगळे आणि लोणचे बनवणे हे वेगळे. कारण ते वर्षभर टिकावं असच बनवाव लागत. प्रत्येकाची बनवण्याची स्टाईल जरी वेगळी असली तरी हा वेळखाऊ प्रकार आहे.

याला बनवताना गडबड करून चालत नाही. मात्र जर खुप श्रम करून बनवलेले लोणचे बिघडले किंवा त्यात मीठ पडले तर? काळजी करू नका तुम्हाला आज मीठ जरी जास्त झाले तर यावर काय करावे याच्या टिप्स देणार आहोत ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

Kitchen Hacks: लोणच्यात जास्त मीठ पडलयं? मग या टिप्स ट्राय करून बघा
Independence Day 2023: चविष्ट आणि पौष्टिक तिरंगा सँडविच कसा तयार करायचा? जाणून घ्या रेसिपी

लसूण लोणचे मिक्स

लसणाचे लोणचे खाण्यास चविष्ट असतेच शिवाय याला बनवण्यासाठी जास्त सूर्यप्रकाश लागत नाही. लोणच्यामध्ये जर जास्त मीठ असेल तर लसणाचे लोणचे (मीठ न घालता बनवलेले) मिक्स करू शकता. यामुळे तुमच्या लोणच्यातील मीठ संतुलित राहील आणि लोणच्याची चवही वाढेल.

व्हिनेगर घाला

लोणचे बनवत असताना मीठ जास्त पडले तर तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. व्हिनेगर मीठाच्या कडकपणाचे बॅलेन्स करते. लिंबाच्या आंबट गोड लोणच्यामध्ये मीठ जास्त असेल तर त्यात उसाचा रस मिक्स करा.

Kitchen Hacks: लोणच्यात जास्त मीठ पडलयं? मग या टिप्स ट्राय करून बघा
Red Velvet Balls Recipe: केक तर अनेकदा खाल्ला असेल, आता ट्राय करा रेड वेल्वेट बॉल्स, जाणून घ्या सोपी रेसिपी

लिंबाच्या रसात मिसळा

काही लोणची अशी असतात ज्यात तुम्ही लिंबाचा रस घालून मीठाचे प्रमाण कमी करू शकता. कारण लिंबाचा रस आंबट असतो आणि त्यात आंबट मिसळले तर त्यात मीठ कमी मिळू लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.