

How to wash leafy vegetables properly
Sakal
Kitchen Tips: हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. नियमितपणे सेवन केल्याने लोह, प्रथिने, रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. पण पालेभाज्या वापरण्यापूर्वी स्वच्छ धुणे गरजेचे असते. मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी सोशल मिडियावर याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. अनेक लोक मोठ्या भांड्यात पालेभाज्या धुतात आणि नंतर हाताने पकडून पाणी ओतून देतात. ज्यामुळे पालेभाज्याची घाण निघून जाण्याएवजी ती पानांवर चिकटून राहते. यामुळे पालेभाज्या धुतांना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.