त्रासदायक झुरळांपासून करा सुटका; वापरा सोप्प्या ७ टीप्स

झुरळांमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते.
Cockroach
Cockroach

झुरळ हे नाव जरी घेतलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. किळसवाणा वाटणारा हा कीटक स्वयंपाकघर, कपाट अशा काही मोजक्या ठिकाणी सहज आढळून येतो. त्यामुळे तो दिसला की अनेकांची घाबरगुंडी उडते. खरं तर अस्वच्छ ठिकाणी झुरळांचा वावर जास्त असतो. परंतु, एकदा का झुरळाने घरात प्रवेश केला की तो सहजरित्या त्या घराचा ताबा काही सोडत नाही. मग, खाद्यपदार्थ असो वा एखादी वस्तू तो सर्वत्र वावरतो. झुरळांमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना वेळीच पिटाळून लावल्यास फायद्याचं ठरतं. अनेकदा पेस्टकंट्रोल केल्यावरही झुरळांची संख्या कमी होत नाही. अशा वेळी काही घरगुती उपाय करणं फायद्याचं ठरेल. म्हणूनच झुरळ पळवून लावायचे घरगुती उपाय कोणते ते पाहुयात.

१. झुरळांचा प्रादुर्भाव जेथे जास्त आहे तेथे बोरिक पावडर टाकावी.

२. झुरळ असलेल्या ठिकाणी लवंग ठेवावी.

हेही वाचा : अजबच! कर्मचाऱ्याचं चौथं लग्न अन् बँकेला पडला भुर्दंड, कारण..

३. बोरिक पावडर दुधात मिक्स करुन त्याची पेस्ट करावी. ही पेस्ट कापसाच्या सहाय्याने घरातील कान्याकोपऱ्यात लावावी.

४. काळेमिरे, कांदा व लसूण यांची पेस्ट करुन ती पेस्ट पाण्यात मिसळा. त्यानंतर हे पाणी घरात स्प्रेच्या सहाय्याने सर्वत्र शिंपडा.

५. कडुनिंबाच्या उग्रवासामुळे झुरळ पळून जातात. त्यामुळे कडुनिंबाची पावडर किंवा तेल घरातील कोपऱ्यांमध्ये टाका.

६. घरात स्वच्छता ठेवा.

७. शिळे अन्नपदार्थ उघड्यावर ठेऊ नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com