esakal | अजबच! कर्मचाऱ्याचं चौथं लग्न अन् बँकेला पडला भुर्दंड, कारण..
sakal

बोलून बातमी शोधा

अजबच! कर्मचाऱ्याचं चौथं लग्न अन् बँकेला पडला भुर्दंड, कारण..

अजबच! कर्मचाऱ्याचं चौथं लग्न अन् बँकेला पडला भुर्दंड, कारण..

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सात दिवस नियमित काम केल्यानंतर रविवारी मिळणारी सुट्टी प्रत्येकालाच सुखावह असते. त्यामुळे खरं म्हणायलं गेलं तर सुट्टी हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. परंतु, काही कर्मचारी असेही असतात जे आठवडा सुट्टीव्यतिरिक्त अन्य सुट्ट्या घेण्यासाठी विविध शक्कल लढवत असतात. असाच एक प्रकार ताइपेई येथे घडला आहे. सुट्टी मिळावी यासाठी एका व्यक्तीने चक्क त्याच्याच पत्नीसोबत तब्बल ४ वेळा लग्न केलं. मात्र, त्याचं चौथं लग्न त्यांच्या कार्यालयाला म्हणजेच ऑफिसला चांगलंच महागात पडलं आहे.

हेही वाचा : नशिबाची थट्टा! नॅशनल लेव्हलच्या बॉक्सरवर आली रिक्षा चालवायची वेळ

ताईपेई येथे राहणारा एका बॅक कर्मचाऱ्याने सुट्टी मिळावी यासाठी त्याच्या पत्नीसोबत चार वेळा लग्न केलं. इतकंच नाही तर सुट्टी वाढवून मिळावी म्हणून त्याने त्याच पत्नीला चक्क तीन वेळा घटस्फोटही दिला. सुट्टीसाठी हा कर्मचारी करत असलेला सावळागोंधळ बॅकेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्याला सुट्टी देण्यास नकार दिला. मात्र, हाच नकार बॅकेला महागात पडला आहे. केवळ महागातच नाही तर, त्यांना चांगला मोठा भुर्दंडदेखील भरावा लागला आहे.

बॅकेत क्लार्क पदावर काम करणाऱ्या या व्यक्तीला पेड लिव्ह हवी असल्यामुळे त्याने ही नामी शक्कल लढवली आहे. या कर्मचाऱ्याला पहिल्या लग्नासाठी ८ दिवस पेड लिव्ह (सुट्टी) देण्यात आली होती. लग्न झाल्यावर काही दिवसातच त्याने पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर पुन्हा त्याच पत्नीसोबत लग्न करण्यासाठी त्याने पुन्हा बॅकेत सुट्टीसाठी अर्ज केला. अशा प्रकारे सुट्ट्यांचं सत्र सुरु ठेवण्यासाठी त्याने त्याच्या पत्नीसोबत ४ वेळा लग्न केलं व तिला ३ वेळा घटस्फोट दिला. विशेष म्हणजे कर्मचारी करत असलेली ही फसवणूक बॅकेच्या लक्षात आली.

हेही वाचा : कासवालाही गुडघेदुखीची समस्या; वाढलेल्या वजनामुळे चालणंही अशक्य

संबंधित कर्मचाऱ्याने चौथ्या लग्नासाठी सुट्टी मिळावी यासाठी बॅकेत अर्ज केला. त्यावर संबंधित प्रकार समोर आल्यामुळे बॅकेने या कर्मचाऱ्याला पेड लिव्ह नाकारली. विशेष म्हणजे सुट्टी नाकारल्यानंतर या कर्मचाऱ्याने बॅकेविरोधात ताईपेई सिटी लेबर ब्युरोमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर बॅकेविरोधात कारवाई करण्यात आली.

कायद्यानुसार, कर्मचाऱ्यांना लग्नासाठी ८ दिवसांची रजा दिली जाते. या व्यक्तीच्या प्रकरणात त्याने चार वेळा लग्न केलं म्हणजे त्याच्या ३२ सुट्ट्या झाला होत्या. त्याच्या तक्रारीनंतर लेबर ब्युरोकडून या संबंधित प्रकाराची चौकशी करण्यात आली. या चौकशीत बॅकेने कामगार कायद्याचं उल्लंघन केल्याचं समोर आलं. त्यामुळे बॅकेला २० हजार डॉलर म्हणजेच ५२ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.