चांदीसारखी चमकतील तुमच्या किचनमधील स्टीलची भांडी, जाणून घ्या स्वस्त व मस्त उपाय

वारंवार वापरामुळे स्टील धातूच्या भांड्यांवरील चमक नाहीशी होते. पण या भांड्यांवरील चमक दीर्घकाळ टिकवून ठेवण्याची तुमची इच्छा आहे का? चला तर मग जाणून घेऊया उपाय
Steel cook wear washing tips
Steel cook wear washing tipssakal

स्वयंपाकघरामध्ये स्टीलच्या धातूच्या भांड्यांचा सर्वाधिक वापर केला जातो. कारण स्टीलच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवल्याने आरोग्यास हानी पोहोचत नाही, असे म्हटले जाते. वारंवार होत असलेल्या वापरामुळे स्टीलची भांडी काळी पडू लागतात, त्यावरील चमक नाहीशी होते. पण आपण काही सोपे घरगुती उपाय करून स्टीलची भांडी स्वच्छ करू शकता, ज्यामुळे भांड्यावरील चमक नाहीशी होणार नाही आणि स्वच्छही होतील.

बेकिंग सोडा

स्टीलच्या भांड्यांवरील काळ्या डागांची समस्या दूर करायची असल्यास आपण बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी एका छोट्या बादलीमध्ये गरम पाणी घ्या. यामध्ये दोन चमचे बेकिंग सोडा मिक्स करा. आता या पाण्यामध्ये भांडी भिजत ठेवा. कमीत कमी ३० मिनिटे भांडी या पाण्यात ठेवावी. यानंतर साबणाने भांडी स्वच्छ धुऊन घ्या.

Steel cook wear washing tips
Stress Relief Food मानसिक व शारीरिक तणाव कमी करायचाय? या 2 फळांचं करा सेवन

व्हिनेगर

मिठाच्या पाण्यामुळे भांड्यावर काळ्या रंगाचे थर जमा होऊ लागतात. भांड्यावर जमा झालेला हा थर स्वच्छ करण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात दोन चमचे व्हिनेगर घ्यावे आणि ज्याप्रमाणे भांडी घासतो त्याप्रमाणे व्हिनेगर काळ्या पडलेल्या भांड्यांवर लावावे. काही वेळानंतर भांडी साबणाने स्वच्छ घासून घ्या. व्हिनेगरचा वास येत असल्यास भांडी काही वेळासाठी उन्हात ठेवा.  

Steel cook wear washing tips
Almond Dates Ladoo Benefits मुलांना खजूर-बदामाचे लाडू खायला द्या, जाणून घ्या फायदे व रेसिपी

बेकिंग सोडा आणि लिंबू 

एका वाटीमध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्रित घ्या. हवे असल्यास यामध्ये आपण पाणी मिक्स करू शकता. यानंतर हे मिश्रण भांड्यावर लावा व तासभरासाठी भांडी तशीच ठेवावीत. तासाभरानंतर गरम पाण्याने भांडी स्वच्छ धुऊन घ्यावीत. या मिश्रणामुळेही भांड्यावर जमा झालेली घाण स्वच्छ होण्यास मदत मिळते.  

Steel cook wear washing tips
Monsoon Special Recipes : संजीव कपूर यांनी शेअर केली बटाट्याच्या भजीची साधीसोपी रेसिपी

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com