esakal | वाचनाची आवड आहे? मग मुंबईतील 'या' ५ बूक कॅफेला नक्की भेट द्या
sakal

बोलून बातमी शोधा

वाचनाची आवड आहे? मग मुंबईतील 'या' बूक कॅफेला नक्की भेट द्या

वाचनाची आवड आहे? मग मुंबईतील 'या' बूक कॅफेला नक्की भेट द्या

sakal_logo
By
शर्वरी जोशी

वाचनाची आवड असणाऱ्यांसाठी उत्तम जागा कोणती? पुस्तकांनी भरलेलं घर आणि गरमागरम कॉफी पित असलेलं शांत वातावरण. जेथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करायला नसेल. फक्त तुम्ही, तुमचं पुस्तक आणि कॉफी..बास्स..एका वाचनवेड्या व्यक्तीसाठी हे इतकंच पुरेसं आहे. परंतु, अनेकदा काही जणांना असं वातावरण मिळत नाही. म्हणूनच, सध्या अनेक ठिकाणी बुक कॅफे सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईतील अशाच काही बुक कॅफेविषयी जाणून घेऊयात. (know-about-famous-book-cafes-in-mumbai-ssj93)

खरं तर मुंबई म्हणजे धावत शहर. इथे प्रत्येक गोष्ट घड्याळाच्या काट्यावर सुरु असते. त्यामुळे सतत आजूबाजूला गडबड, गोंधळ पाहायला मिळतो. परंतु, या सगळ्यांमधून वाचनवेड्या लोकांसाठी काही बुक कॅफे सुरु झाले आहेत. हे कॅफे कोणते व कुठे आहेत याचा थोडक्यात आढावा घेऊयात.

हेही वाचा: बिर्याणी करताना तांदूळ ओव्हर कूक होतो? फॉलो करा 'या' ३ टीप्स

१. फूड फॉर थॉट -

मुंबईतील एमजी रोडवर फूड फॉर थॉट हा कॅफे आहे. जवळपास १५० वर्ष जुनी परंपरा या कॅफेला लाभली आहे. वाचनप्रेमींसाठी हा उत्तम कॅफे असून फूड फॉर थॉटची सुरुवात किताबखाना या नावाने झाली होती. मराठी, हिंदी, इंग्रजी, ऊर्दू आणि गुजराती अशा अनेक भाषांमध्ये इथे पुस्तक उपलब्ध आहेत. फूड फॉर थॉटमध्ये पुस्तक वाचनासोबतच पुस्तक प्रकाशन, लेखन कार्यशाळेचंदेखील आयोजन केलं जातं.

पत्ता -

45/47, किताबखाना, सौम्या भवन, महात्मा गांधी रोड, फ्लोरा फाउंटेन, फोर्ट, मुंबई).

२. लीपिंग विंडो -

लीपिंग विंडो कॅफे हा पुस्तकांसोबतच तेथील इंटेरिअरमुळे विशेष प्रसिद्ध आहे. पुस्तक वाचतानाचं परफेक्ट वातावरण येथे आहे. गडबड गोंधळापासून दूर अशा ठिकाणी आल्याचं फिलिंग येथे येते. येथे विविध प्रकारचे कॉमिक्स आणि अनेक कादंबऱ्या पाहायला मिळतात. सुरुवातीच्या काळात लीपिंग विंडो ही ऑनलाइन लायब्ररी होती. मात्र, दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकप्रियता पाहता त्यांनी बुक कॅफे सुरु करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे येथे बैठक व्यवस्था अत्यंत आकर्षक आहे. वाचकांना बसण्यासाठी खास बीन बॅग्स ठेवण्यात आल्या आहेत.

पत्ता -

२ अँड ३, कॉर्नर व्ह्यू, अशोक चोपडा मार्ग, अपोझिट बियांका टॉवर, वर्सोवा

३. पृथ्वी कॅफे -

मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी हा कॅफे आहे. या कॅफेला वाचनप्रेमींसह दिग्गज कलाकार, स्ट्रगल करणारे कलाकार, प्रसिद्ध लेखक, निर्माते, साहित्यिकदेखील भेट देत असतात. हा कॅफे एका मोकळ्या जागेत उभारण्यात आला आहे.

पत्ता -

पृथ्वी थिएटर, जानकी कुटीर, जुहू चर्च रोड, जुहू.

४. टायटल वेव्स-

टायटल वेव्स हा एक लहानसा कॅफे असून त्याला डि बेला नावानेदेखील ओळखलं जातं. हे मुंबईतील सर्वात पहिलं बुटिक बुक स्टोर आहे. इथे मोठ्या प्रमाणावर पुस्तक असून शांत वातावरणात पुस्तक वाचनाचा आनंद तुम्हाला घेता येईल.

पत्ता -

सेंट पॉल मीडिया कॉम्प्लेक्स, रोड नं. २४.बांद्रा वेस्ट, मुंबई

५. नेबरहुड बुक कॅफे -

नेबरहूड कॅफे तेथील वातावरणामुळे जास्त प्रसिद्ध आहे. येथे बसण्यासाठी बांबूपासून तयार केलेल्या खुर्च्या आणि सोफे आहेत. तसंच घरगुती कुकीज व ब्राऊनीजदेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे पुस्तक वाचताना तुम्ही ब्राऊनीजचा सुद्धा आनंद घेऊ शकता.

पता-

दुकान 3, सेक्टर 2, समाधान को-ऑपरेटिव्ह सोसायटी, कोपरखैरणे, नवी मुंबई

loading image
go to top