तुम्हाला देखील च्युइंगम खाण्याची सवय आहे? तात्काळ सोडा, अन्यथा..

chewing gum habit
chewing gum habit

आपल्यापैकी बरेच जणाना च्युइंगम (chewing gum) चघळळ्याची सवय असते, टिव्ही, सिनेमात पाहूण किंवा अनेकदा लोक श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी च्युइंगम चघळतात. पण ही सवय चांगली आहे का? याचे आपल्या शरिरावर काय परिणाम होतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आपण या सवयीबद्दल काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

तुम्हाला सतत च्युइंगम चघळण्याची सवय असेल तर ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते, याची तुम्हाला कल्पना देखील नसते. एका संशोधनानुसार, पुदिन्यासोबत च्युइंगम चघळणे हे आरोग्यासाठी खूप घातक ठरू

chewing gum habit
चित्रकाराचे अनोखे शिवप्रेम, स्वत:च्या रक्ताने रेखाटले छत्रपती!

च्युइंगमचे तोटे काय आहेत?

जास्त वेळ च्युइंगम चघळल्याने पोटात गॅस तयार होतो आणि जर तुम्हाला सतत च्युइंगम चघळण्याची सवय असेल तर त्यामुळे पोट फुगण्याचीही तक्रार होऊ शकते. त्यासोबत च्युइंगम खाल्ल्याने डोकेदुखी होऊ शकते. वास्तविक, त्यात कृत्रिम तयार केलीली चव आणि प्रिझरव्हेटीव्ह असतात ज्यामुळे डोकेदुखीची समस्येत वाढ होते.

च्युइंगम चघळल्यानंतर एखाद्याला जंक फूड खावेसे वाटते जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. च्युइंगममध्ये असलेल्या साखरेमुळे दातांच्या समस्या वाढण्याची शक्यता वाढते. आजकाल अनेक च्युइंगम्स देखील शुगर फ्री येतात, पण त्यात अॅसिडचा वापर चव येण्यासाठी केला जातो, ज्यामुळे दातांची आरोग्य बिघडते.

chewing gum habit
iPhone चे इतके चाहते का आहेत? असं काय आहे जे Android मध्ये नाही..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com