esakal | जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवायला तयार आहात का?
sakal

बोलून बातमी शोधा

Relationship

जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवायला तयार आहात का?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

तुम्ही एखाद्या व्यक्तीला डेट करताना जोडीदारासोबत शारीरिक संबंधाविषयी चर्चा होत असते. यावेळी तुमच्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवायचे की नाही हा निर्णय तुमचा स्वतःचा असतो. पण, एखादी व्यक्ती जोडीदारासोबत एकरुप होत असेल तर नात्यातील तो महत्वाचा क्षण असतो. पण, रिलेशनशिपमध्ये (Relationship) असताना तुम्ही जोडीदारासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास तयार आहात की नाही, हे कसं ओळखायचं? असा प्रश्न देखील तुमच्या मनात येत असेल. आज याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हेही वाचा: शारीरिक संबंधांमुळे फक्त दुःख मिळते, मॉडलने सांगितला अनुभव

हेही वाचा: वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध का गरजेचे आहेत?

आत्मविश्वास -

शारीरिक संबंधांनंतर येणाऱ्या इमोशनल कॉम्प्लिकेशंस हाताळण्यात तुम्ही सक्षम आहात, असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नात्यातील शेवटची पायरी ओलांडण्यास तयार आहात असं समजावे. एकदा तुमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला, की तुमच्या मनात याविषयी शंका उपस्थित होणार नाहीत.

तुम्ही कोणत्या मुलाला डेट करताय? -

रिलेशनशिपमध्ये तुमचा जोडीदार कसा आहे? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तुमचा आणि तुमच्या जोडीदाराच्या रोमांसच्या बाबतीत भावना जुळतात का? हे देखील पाहणे तितकेच महत्वाचे आहे. तसेच तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत स्वतःला सुरक्षीत समजता की नाही? याचाही विचार करायला हवा.

एसटीडीबाबतही असायला हवी माहिती -

प्रत्येकाला सेक्शुअली ट्रांसमिटेड डिसीज याबाबत माहिती असायला हवी. तुम्हाला याबाबत माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास तयार नाहीत असं समजावे.

स्वतःच्या आनंदाचा विचार -

तुमचा जोडीदार वारंवार तुम्हाला शारीरिक संबंधासाठी विचारतो म्हणून फक्त त्याच्या खुशीसाठी तर तुम्ही नात्यातील शेवटची पायरी ओलांडण्याचा प्रयत्न करत नाही ना? हे देखील लक्षात घ्यायला हवे. शारीरिक संबंधांसाठी जोडीदाराच्या आनंदाचा विचार करून चालणार नाही. यासाठी तुम्ही किती आनंदी आहात याचा विचार करावा. या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद मिळत असेल तरच तुम्ही पुढचे पाऊल टाकावे.

loading image
go to top