प्रोफाइल फोटो कोणता ठेऊ? प्रश्न पडला असेल तर जाणून घ्या हटके टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रोफाइल फोटो नेमका कसा असावा? जाणून घ्या टीप्स

प्रोफाइल फोटो नेमका कसा असावा? जाणून घ्या टीप्स

सध्याच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झालं आहे. आणि, खरं सांगायचं झालं तर सध्या याच माध्यमाकडे तुमची ओळख म्हणूनही पाहिलं जातं. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अॅप अशा अनेकविध अॅप्सच्या माध्यमातून जगातील असंख्य माणसं एका छताखाली जोडली जातात. त्यातच आपण या अॅप्सवर सेट करत असलेल्या प्रोफाईल फोटोमुळे (profile photo) आपली ओळख पटण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक जण साधारणपणे आठवड्यातून एकदा तरी आपला प्रोफाईल फोटो नक्कीच बदलत असतो. परंतु, अनेकदा कोणता फोटो ठेवावा हा प्रश्न आपल्या समोर असतो म्हणूनच प्रोफाइल फोटोची निवड कशी करावी ते पाहुयात. (know how should a profile photo be)

१. चेहऱ्याची फ्रंट साईड काय असावी -

प्रोफाइलवर स्वत: फोटो ठेवत असाल तर कायम तुमचा चेहरा स्पष्ट दिसेल असाच असावा. शक्यतो चेहऱ्याची फ्रंट साईट दिसावी. तसंच ग्रुप फोटो किंवा पाळीव प्राण्यांसोबत फोटो ठेवणंही टाळावं. हे फोटो हसरे आणि पॉझिटिव्ह व्हाइब्स देणारे असावेत.

२. फोटोत भरपूर उजेड हवा -

अंधारात किंवा झाकोळलेल्या ठिकाणी काढलेले फोटो कधीच प्रोफाइलवर ठेऊ नये. भरपूर प्रकाश असेल असाच फोटो ठेवावा, ज्यात तुमचा चेहरा स्पष्ट दिसेल.

हेही वाचा: White Fungus: म्युकोरमायकोसिसनंतर आणखी एक नवा आजार

३. बॅकग्राऊंडची करा निवड -

प्रोफाइल फोटो सेट करतांना फोटोतील बॅकग्राऊंड पाहणंदेखील तितकं महत्त्वाचं आहे. फोटो काढताना तुमच्या पाठीमागे एकाच रंगाची भिंत असेल तर फोटो जास्त चांगला येतो. तसंच फोटो काढतांना भिंतीपासून ५ फूट लांब उभं रहावं.

४. इनडोअर फोटो-

तुम्ही जर एखाद्या बंद खोलीत फोटो काढत असाल, तर तेथे नैसर्गिक उजेड असावा.

५. आऊटडोअर फोटो -

शक्यतो अनेक जण आऊटडोअरचे फोटो प्रोफाइलवर सेट करत असतात. परंतु, यात सकाळ आणि संध्याकाळच्या उजेडात काढलेले फोटो ठेवावेत. भर उन्हातील फोटो नको. कारणस, उन्हामुळे होत असलेला त्रागा तुमच्या चेहऱ्यावर लगेच दिसून येतो.

६. रंग आणि कॉन्ट्रास्ट-

फोटोमध्ये आकर्षक रंगसंगती ठेवावी. पेहराव, भिंतीचा किंवा आजूबाजूची रंगसंगती यामुळे फोटोला वेगळेपणा येतो. फोटोतील गडद रंग फोटो पाहणार्‍याला आकर्षित करतात.

loading image
go to top