हेल्दी राहण्यासाठी किती BMI असणं गरजेचं, ३० पेक्षा जास्त असेल तर या समस्या उद्भवतील

How much BMI is normal: तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असावं हे बॉडी मास इंडेस्कवरून सहज लक्षात येतं. जर तुमचा BMI जास्त असेल तर तुम्हाला लठ्ठपणामुळे Obesity अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो
how much bmi is normal
how much bmi is normalEsakal

How much BMI is normal: निरोगी राहण्यासाठी वजन नियंत्रणात राहणं Weight Control गरजेचं आहे. तुमचं वजन नियंत्रणात आहे हे जाणून घेण्यासाठी BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्सची मदत घेतली जाते. Know the Importance of Body Mass Index for healthy life

तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असावं हे बॉडी मास इंडेस्कवरून सहज लक्षात येतं. जर तुमचा बाॅडी मास इंडेक्स BMI जास्त असेल तर तुम्हाला लठ्ठपणामुळे Obesity अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

अलिकडच्या काळामध्ये वाढतं वजन Weight Gain ही एक मोठी समस्या ठरू लागली आहे. चुकीचा आहार Diet आणि आहाराच्या बदललेल्या वेळा, सक्रिय नसणं तसचं बदलेल्या जीवनशैलीमुळे वजन आणि शरीरातील चरबी वाढू लागते. अर्थात याचा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर दिसू लागतो आणि विविध आजारांना निमंत्रण मिळतं.

सामान्यपणे BMI हा १८.५ ते २४.९ असणं गरजेचं असतं. यामध्ये तुमचा BMI असल्यास तुमचं वजन हे तुमच्या उंचीनुसार योग्य आहे असं समजावं. मात्र जर तुमचा BMI हा २४.९ पेक्षा थोडा जरी जास्त असेल तर तुमचं वजन जास्त आहे, हे लक्षात घ्यावं. तसचं ३० हून जास्त BMI असेल तर तुम्हाला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

फॅटी लिव्हरची जोखिम

जास्त वजन किंवा लठ्ठपणाचा परिणाम तुमच्या लिव्हर म्हणजेच यकृतावर होवू शकतो. वजन जास्त असल्यास लिवरवर फॅट्स जमा होवू लागतात. यामुळे यकृताच्या सामान्य कार्यावर परिणाम होवू लागतो. परिणामी सोरायसिसचा धोका वाढू लागतो.

हे देखिल वाचा-

how much bmi is normal
Fitness Funda : हेल्दी असणं तुमच्या BMI वर अवलंबून नाही, ही पद्धत चुकीची; तज्ज्ञ सांगतात...

कार्डिओमायोपॅथीचा धोका

कार्डिओमायोपॅथी म्हणजेच हृदयाच्या स्नायूंच्या समस्यांमुळे हृदयाला रक्त पंप करणं कठीण होऊ शकतं. तसचं तज्ञांच्या मते जास्त बीएमआयमुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होवू शकते. यामुळे हृदय जाड बनत. यामुळे हृदयाचं रंक्त पंप करण्याचं काम कठिण होतं आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.

मधुमेहासह मानसिक आजारांचा धोका

तुमचा बॉडी मास इंडेक्स जास्त असेल म्हणजेच जर तुमचं वजन जास्त असेल तर अनेक आजारांना निमंत्रण मिळतं. यामध्ये हाय कोलेस्ट्रॉल किंवा ट्राइग्लिसराइड्सच प्रमाण वाढणं हे एक मोठी आणि सामान्य मात्र तितकीच गंभीर समस्या आहे.

तसच वजन जास्त असल्यास टाइप-२ डायबेटिस, पित्ताशयाचे आजार, स्लीप एपनिया आणि श्वास घेण्यासही त्रास होवू शकतो. तसचं लठ्ठपणामुळे शरीरात वेदनांचा त्रास होवू शकतो तसचं रोजच्या दिनचर्येतील काम करण्यास समस्या निर्माण होतात.

जास्त वजन असल्यास धमन्यांच्या विविध समस्या निर्माण होवू शकतात. तसचं ब्रेस्ट आणि लिवर कॅन्सरसारख्या अनेक कॅन्सरचा धोका निर्माण होतो.

बीएमआयमध्ये वाढ झाल्याने नैराश्य, तणाव वाढू शकतो आणि तुमचं मानसिक संतुलन बिघडू शकतं.?

यासाठी वजन नियंत्रणात असणं अत्यंत गरजेचं आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि चांगली जीवनशैली यांच्या मदतीने तुम्ही वजन नियंत्रणात राखू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com