Valentine Week List 2023 : व्हॅलेंटाईन वीकमध्ये कधी कोणता दिवस माहितीये? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Valentine Week List 2023

Valentine Week List 2023 : व्हॅलेंटाईन वीकमध्ये कधी कोणता दिवस माहितीये?

Valentine Week List 2023: फेब्रुवारी महिना म्हटला की सर्वांच लक्ष असतं ते व्हॅलेंटाईन डे कडे, प्रेमात पडलेल्या, पडू पाहणाऱ्या अशा प्रत्येकासाठी हा दिवस खूप मोलाचा असतो. १४ फेब्रुवारीला तर वेगळीच झिंग असते, पण याचं सेलिब्रेशन आठवडा भरा आधीपासून सुरू होतं. रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे आणि किस डे हे दिवस आधी सेलिब्रेट होत असतात. 

व्हॅलेंटाईन वीकच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहे, त्या त्या दिवासानुसार लोकं आपल्या पार्टनरला गिफ्ट देत असतात. म्हणून, जर तुम्ही प्रेमात असाल आणि फेब्रुवारीच्या प्रेमाच्या तारखेबद्दल गोंधळलेले असाल, तर हे शेवटपर्यंत वाचा.. 

Valentine Week List 2023

Valentine Week List 2023

7 फेब्रुवारी - रोझ डे (Rose Day)

व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेशनची सुरुवात 7 फेब्रुवारीला रोझ डेने होते, या दिवशी गुलाबाच्या रंगालाही महत्त्व आहे - लाल गुलाब प्रेमासाठी, पिवळा मैत्रीसाठी, गुलाबी रंग प्रशंसा आणि लाल टिपांसह पिवळा गुलाब म्हणजे मैत्रीच्या भावनांचे प्रेमात रूपांतर झाले आहे आणि बरेच काही.

Valentine Week List 2023

Valentine Week List 2023

8 फेब्रुवारी - प्रपोज डे (Propose Day)

रोज डे नंतर 8 फेब्रुवारीला प्रपोज डे येतो. नावाप्रमाणेच प्रपोज डेला लोक त्यांच्या जोडीदाराला किंवा क्रशला प्रपोज करतात. तुम्हीही असं एखाद्याला छान प्लॅनिंग करून प्रपोज करू शकतात. 

Valentine Week List 2023

Valentine Week List 2023

9 फेब्रुवारी - चॉकलेट डे (Chocolate Day)

व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस म्हणजे चॉकलेट डे आहे, रिलेशनशिपमध्ये एकमेकांना चॉकलेट देणं खूप रोमॅंटिक समजलं जातं. तुम्हीही आपल्या पार्टनरला चॉकलेट देऊ शकतात. 

Valentine Week List 2023

Valentine Week List 2023

10 फेब्रुवारी - टेडी डे (Teddy Day)

व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस म्हणजे टेडी डे. टेडी देण्यामागच कारण म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमचा पार्टनर तिथे हवा असेल आणि तो तिथे नसेल तर तेव्हा या टेडीला तुम्ही कडल करू शकतात. 

Valentine Week List 2023

Valentine Week List 2023

11 फेब्रुवारी - प्रॉमिस डे (Promise Day)

पाचवा दिवस प्रॉमिस डे, तुम्ही या दिवशी एकमेकांना कधीही सोडून जाणार नाही याचं प्रॉमिस देऊ शकतात. नेहमी एकमेकांना साथ देऊ, एकमेकांच्या सोबत राहू, एकमेकांना प्रोत्साहन देऊ असं सांगू शकतात. 

Valentine Week List 2023

Valentine Week List 2023

12 फेब्रुवारी - हग डे (Hug Day) 

व्हॅलेंटाईन वीकचा सहावा दिवस हग डे आहे. अनेकदा आपण भेटतो पण त्यातही मनासारखी एक मिठी राहून जाते, याचं प्रयोजन म्हणून हा दिवस... 

Valentine Week List 2023

Valentine Week List 2023

13 फेब्रुवारी - किस डे (Kiss Day)

13 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस आधी किस डे साजरा केला जातो. प्रेमात असलेले लोक या दिवशी एकमेकांना किस करतात. 

Valentine Week List 2023

Valentine Week List 2023

14 फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे (Valentine Day)

शेवटी, 14 फेब्रुवारी रोजी, जगभरातील प्रेम करणाऱ्या लोकांचा आवडता दिवस.. व्हॅलेंटाईन डे. तुम्ही या दिवशी बाहेर फिरायला जाऊ शकतात, एकमेकांना गिफ्ट देऊ शकतात, जरावेळ एकत्र घालवू शकतात. 

व्हॅलेंटाईन वीकनंतर, लोक प्रेमाशी संबंधित नसलेला अँटी-व्हॅलेंटाईन वीक साजरा करतात. त्याची सुरुवात स्लॅप डेने होते, त्यानंतर किक डे, परफ्यूम डे, फ्लर्ट डे, कन्फेशन डे आणि मिसिंग डे असे दिवस साजरे केले जातात.