International Driving License : परदेशात गाडी चालवायचीय ? लायसन्स मिळवण्यासाठी अशी आहे प्रक्रिया

इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्समुळे तुम्हाला परदेशातही वाहन चालवण्याची परवानगी मिळेल. हे लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या रिजनल ट्रांसपोर्ट ऑफिस म्हणजेच RTO मध्ये योग्य कागदपत्र जमा करावी लागतील. त्यानंतर इथूनच तुम्हाला हे विदेशी वाहन परवाना मिळेल
इंटरनल ड्रायव्हिंग लायसन्स
इंटरनल ड्रायव्हिंग लायसन्सEsakal

वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स Driving License असणं म्हणजेच वाहन चालक परवाना असणं बंधनकारक आहे. भारतामध्ये वाहन परवान्यासाठी वयाची १८ वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. Know the procedure to get international driving license

वाहन परवान्याशिवाय वाहन चालवल्यास परिवहन विभागाकडून RTO मोठा दंड आकारला जातो शिवाय कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. जर तुमच्याकडे भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स Driving License आहे. मात्र तुम्हाला परदेशात जाऊन तिथंही वाहन चालवण्याची आवश्यकता भासणार असेल तर मात्र तुमचं भारतीय लायसन्स ग्राह्य धरलं जाणार नाही.

यासाठी तुमच्याकडे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स International Driving License असणं गरजेचं आहे.

इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्समुळे तुम्हाला परदेशातही वाहन चालवण्याची परवानगी मिळेल. हे लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या रिजनल ट्रांसपोर्ट ऑफिस म्हणजेच RTO मध्ये योग्य कागदपत्र जमा करावी लागतील. त्यानंतर इथूनच तुम्हाला हे विदेशी वाहन परवाना मिळेल.

इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सच्या अटी

International Driving Licence घेण्यासाठी तुम्हाला काही अटींची पूर्तता करावी लागेल. यातील पहिली अट म्हणजे तुमच्याकडे भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स असणं बंधनकारक आहे. तर दुसरी अट म्हणजे लायसन्स काढणारी व्यक्ती भारताची नागरिक असणं गरजेचं आहे.

हे लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जावं लागेल. इथं तुम्हाला फाॅर्म A भरून जमा करावा लागेल. तसचं तुम्ही कोणत्या देशात जात आहात आणि किती दिवसांसाठी जात आहात याची माहिती देखील तुम्हाला RTOला द्यावी लागेल.

हे देखिल वाचा-

इंटरनल ड्रायव्हिंग लायसन्स
Renew Driving Licence: घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स Renew कसं करायचं?

International Driving Licenceसाठी आवश्यक कागदपत्रं

- यासाठी तुम्हाला RTOमध्ये तुमचं भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स द्यावं लागेल.

- तसंच तुमचा पासपोर्ट पुढील ६ महिन्यांसाठी व्हॅलिड म्हणजेच वैध हवा.

- अर्जासोबत तुम्हाला ४ पासपोर्ट आकारातील फोटो आणि व्हिजाच्या दोन कॉपी जोडाव्या लागतील.

- तसंच तुमच्या पासपोर्टची कॉपी आणि तुमचं परदेशात जाण्या-येण्याच्या तिकीटाची कॉपी जोडणं बंधनकारक आहे.

- इंटननॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तुम्हाला १ हजार रुपये फी भरावी लागेल.

हे देखिल पहा-

याशिवाय तुम्ही ज्या RTO कार्यालयातून तुमचं भारतीय लायन्सस मिळवलं आहे. त्यात RTOमध्ये तुम्हाला International Driving Licence साठी अर्ज करावा लागेल. जर तुम्ही इतर ठिकाणच्या आरटीओमध्ये विदेशी परवान्यासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला तुमच्या RTO ऑफिसमधून NOC लेटर घेऊन ते अर्जासोबत जोडावं लागेल.

मेडिकल सर्टिफिकेट

इंटननॅशनल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी सीएमवी4 फॉर्म भरल्यानंतर त्यावर तुम्हाला एखाद्या डॉक्टरची सही घ्यावी लागेल. परवान्यासाठी अर्ज करत असताना तुम्ही शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या फिट असणं गरजेचं आहे. यासाठीच डॉक्टरांची सही गरजेची असते.

हे देखिल वाचा-

इंटरनल ड्रायव्हिंग लायसन्स
दिव्यांगानाही मिळणार Driving Licence, शासनाच्या दिव्यांगांसाठी खास योजना

एक वर्षासाठी परवाना वैध

इंटननॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सची व्हॅलिटीडी १ वर्षाची असते. म्हणजेच त्यानंतर या परवान्याची मुदत संपते. हा परवाना तुम्ही पुन्हा रिन्यू करू शकत नाही. यासाठी तुम्हाला पुन्हा नवा अर्ज करून नवा परवाना काढावा लागतो. जवळपास १५० देशांमध्ये हा परवाना ग्राह्य धरला जातो. म्हणजेच १५० देशांमध्ये तुम्ही या इंटननॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सच्या आधारावर वाहन चालवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com