आता Driving Licence अन् RC एकत्र ठेवण्याची नाही गरज; होणार नाही दंड

ड्रायव्हरकडे सगळी कागदपत्रं असणं खूप महत्त्वाचं असतं.
driving licence
driving licenceesakal
Summary

ड्रायव्हरकडे सगळी कागदपत्रं असणं खूप महत्त्वाचं असतं.

जर तुम्ही वाहन चालवताना तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) किंवा RC (रजिस्ट्रेशन कार्ड) कधीकाळी ठेवला नाही तर तुमचं चलन कापलं जाईल. कारण ही कागदपत्रं ड्रायव्हरकडे असणं खूप महत्त्वाचं असतं. पण आता ही सगळी कागदपत्रं सोबत बाळगायची गरज नाहीयेय.

driving licence
आता RTO मध्ये जाऊन Driving Licence Test देण्याची गरज नाही

मोटार वाहन कायदा-1989 मधील दुरुस्तीच्या आधारे केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार आता ड्रायव्हिंग लायसन्स किंवा RCचे (रजिस्ट्रेशन कार्ड) पुस्तक हातात घेऊन जाण्याची गरज नाही. त्याऐवजी तुम्ही ही कागदपत्रं एम परिवाहन मोबाईल अॅपमध्ये (mParivahan mobile app) साठवून ठेवू शकता. गरज पडल्यास आपण त्यांना अधिकाऱ्यांसमोर सादर करू शकता. हे 100 टक्के वापरकर्त्यांसाठी स्वीकार्य, प्रमाणित आणि सोयीस्कर आहे.

driving licence
Aadhaar, Pan, Voter id, Driving License हरवलंय? असे करा डाऊनलोड

mParivahan mobile app आपला ड्रायव्हिंग लायसन्स जोडण्याची सोपी प्रक्रिया

स्टेप 1: सर्वप्रथम Google Play Store वरून एमपरिवहन अॅप (mParivahan mobile app) डाऊनलोड करा.

स्टेप 2: तुमचा मोबाइल नंबर वापरून साइन अप करा. त्यानंतर ओटीपी मिळाल्यावर अॅपवर नोंदणी करा.

स्टेप 3: आता, तुमच्याकडे दोन पर्याय आहेत - डीएल (ड्रायव्हिंग लायसन्स) आणि RC (नोंदणी प्रमाणपत्र).

स्टेप 4: तुमचा डीएल नंबर प्रविष्ट करा.

स्टेप 5 : व्हर्च्युअल डीएल जनरेट करण्यासाठी, 'Add to My Dashboard' वर क्लिक करा.

स्टेप 6: जन्मतारीख प्रविष्ट करा आणि आपला डीएल आपल्या डॅशबोर्डमध्ये जोडला जाईल.

driving licence
Driving License शिवाय चालवता येणार ही इलेक्ट्रीक स्कूटर

त्याचा वापर अशा प्रकारे करा.

स्क्रीनच्या वरच्या बाजूला तुमचा व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन्स पाहण्यासाठी डॅशबोर्ड बटणावर क्लिक करा, एकदा क्लिक केल्यावर तुमच्या डीएल आणि क्यूआर कोडची संपूर्ण माहिती दिसेल. या कोडचा वापर अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची सर्व आवश्यक माहिती स्कॅन करून घेण्यासाठी केला जातो. आपण अ ॅपवर आपल्या वाहनांच्या आरसी बुकची माहिती देखील जोडू शकता.

तुम्ही अधिक वाहने जोडू शकता.

एम.परिवाहन अॅपवर, व्यक्ती किंवा व्यक्तीद्वारे वापरली जाणारी अनेक वाहने जोडू शकता. उदा.,पत्नीने नोंदणी केलेले वाहन चालविणारा पती आपल्या अॅपमध्ये वाहनाचा तपशील देखील जोडू शकतो. त्याचप्रमाणे अनेक मोबाइल डिव्हाइसमध्ये ड्रायव्हिंग लायसन्सचा तपशील जोडला जाऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com