Left आणि Right प्रत्येक देशात गाडी चालवण्याचे वेगळे नियम? काय आहेत या मागची कारणं

काही देशांमध्ये रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहन चालवली जातात, तर काही देशांमध्ये रस्त्याच्या उजव्या बाजूने म्हणजेच Left side steering पाहायला मिळतं. काय आहेत याची कारणं....
डाव्या -उजव्या बाजूचं ड्रायव्हिंग
डाव्या -उजव्या बाजूचं ड्रायव्हिंगEsakal

प्रत्येक देशात तिथल्या नागरिकांसाठी वेगवेगळे नियम असतात. अर्थात यातील अनेक नियम हे परदेशी पाहुण्यांनी पाळणं देखील बंधनकारक असतं. Know why in some countries left and right side driving

यातीलच एक महत्वाचा नियम तो म्हणजे ड्रायव्हिंग Driving अर्थात गाडी चालवणं. प्रत्येक देशामध्ये वाहन चालवण्याचे Driving Rules वेगवेगळे नियम आहेत. यातील महत्वाचा आणि अनेकांसाठी गोंधळात टाकणारा नियम म्हणजे रस्त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूने गाडी चालवणं.

काही देशांमध्ये रस्त्याच्या डाव्या बाजूने वाहन चालवली जातात, तर काही देशांमध्ये रस्त्याच्या उजव्या बाजूने म्हणजेच Left side steering पाहायला मिळतं.

अर्थात त्या त्या देशातील नागरिकांना तिथल्या नियमांप्रमाणे वाहन चालवण्याची Driving सवय अंगवळणी पडलेली असते. मात्र इतर देशातील लोकांना ती विरुद्ध किंवा अवघड वाटू शकते.

भारतामध्ये रस्त्याच्या डाव्या बाजूने गाड्या चालत असल्याने गाड्यांचं स्टेअरिंग व्हिल हे उजव्या बाजूला असतं तर काही देशांमध्ये रस्त्याच्या उजव्या बाजूने गाड्या चालत असल्याने स्टेअरिंग हे डाव्या बाजूला देण्यात आलेलं असतं. जगात ६५ टक्के देशांमध्ये उजवीकडे स्टेअरिंग असलेल्या गाड्या चालवल्या जातात. तर ३५ टक्के देशाममध्ये डावीकडे स्टेअरिंग व्हिल असलेल्या गाड्या चालवल्या जातात.

प्रत्येत देशामध्ये कार चालवण्याचे आणि स्टेअरिंग व्हिलचे नियम वेगवेगळे आणि असे विरुद्ध का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे नियम तिथल्य़ा सरकारने जरी ठरवले असले तरी त्यामागची कारणं ही त्या त्या देशातील किंवा खंडातील इतिहासामध्ये दडलेली आहेत.

हे देखिल वाचा-

डाव्या -उजव्या बाजूचं ड्रायव्हिंग
Driving License Types: भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स वापरून परदेशात गाडी चालवता येते का?

मध्यय़ुगाच्या काळामध्ये प्रवासासाठी घोडे, घोडागाडीचा जास्त वापर होता किंवा लोक पायी प्रवास करत. यावेळी घोडागाडी रस्त्याच्या डाव्याबाजूने चालवली जाई. तसंच डाव्या बाजूला तलवार म्यान केलेली असे. रस्त्यावरून प्रवास करत असताना अचानक हल्ला झाल्यास उजव्या हाताने तलवार काढून हल्ला रोखणं किंवा हल्ला करणं सोपं जात असल्याने रस्त्याच्या डावीकडून घोडे किंवा घोडागाड्या प्रवास करत.

खास करून ब्रिटिशांची राजवट असलेल्या राज्यांमध्ये ही प्रवासाची ही पद्धत पाहायला मिळते. त्यानंतर जसं जसं गाड्यांचं आगमन झालं हाच नियम सुरू राहिला. यामुळे अनेक ब्रिटिश राजवट असलेल्या राज्यांमध्ये गाज्या रस्त्याच्या डाव्या बाजूने धावू लागल्या.

भारतातही ब्रिटिश राजवटीत गाड्या आणि वाहनांचं प्रमाण वाढलं त्यामुळे भारतातही रस्त्याच्या डाव्या बाजूने गाडी चालवण्याचा नियम लागू झाला.

तर फ्रान्समध्ये नेपोलियनने दीर्घ काळ साम्राज्य केलं. नेपोलिय़न बोनापार्ट हे डावखुरे होते. त्यामुळे ते उजव्या हाताने वाहन चालवायचे आणि डाव्या हाताने तलवारबाजी करत. यावरूनच प्रेरित होत फ्रान्समध्ये उजव्या बाजूने गाडी चावण्याचा नियम सुरु झाला. त्यानंतर ज्या देशांवर फ्रान्सने राज्य केलं त्या देशांमध्ये देखील उजव्या बाजूने वाहन चालवण्याचे नियम लागू करण्यात आले.

हे देखिल वाचा-

डाव्या -उजव्या बाजूचं ड्रायव्हिंग
Renew Driving Licence: घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स Renew कसं करायचं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com