Lakme Fashion Week 2022 : पुरुषाने स्कर्ट घालून का केला Ramp Walk?

Lakme Fashion Week 2022 : पुरुषाने स्कर्ट घालून का केला Ramp Walk?

Lakme Fashion Week 2022: लॅक्मे फॅशन वीक 2022चा लॅक्मे अॅब्सोल्युट ग्रँड फिनाले (Lakme Absolute Grand Finale) शोकेसचे नाट्यमय रित्या समारोप झाला. प्रसिद्ध डिझायनर जोडीने फाल्गुनी आणि शेन पीकॉक यांनी डिझाइन केलेले फ्यूचरिष्टिक आणि नव्या स्टाईलमधील पोशाख सादर केले.

समारोप समारंभात(Closing Ceremony )लॅक्मेची ब्रँड अॅम्बेसेडर अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Panday) ही शिमरी शॉर्ट पिंक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

लॅक्मे फॅशन वीक 2022 च्या समारोपापूर्वी, 5वा दिवशी क्रिएटिव्ह नोटवर सुरूवात झाली जिथे फॅशन डिझायनर्सच्या डिझाइन्सने असे डिझाईन सादर केले जेंडर न्यूट्रल (Gender neutral), बॉडी साइज फ्रेंडली (Body size friendly) आणि भारतीय कला आणि शिल्पने (Indian arts and crafts) समृद्ध होते. या रॅम्प वॉकमध्ये पुरुषाने स्कर्ट परिधान केल्याचे दिसते. त्यांनी नाकात रिंग देखील घातली होती, त्याचबरोबर त्यांचे कपडेही प्लस साइजमधील होते. डिझायनर्सने त्यांच्या उत्कृष्ट कलाकृती यावेळी सादर केल्या होत्या.

Lakme Fashion Week 2022 : पुरुषाने स्कर्ट घालून का केला Ramp Walk?
ट्रेनची वाट पाहणे होणार मजेशीर, रेल्वे स्टेशनवर आता Gaming Zone

सहकारी डिझायनर अभिषेक शर्मा आणि त्याच्या कामाला सहाय्य करत, प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल युवा डिझायनरसाठी शो स्टॉपर बनले. रनवेवर Cool स्टाईलने कॅट वॉक करताना, रोहित बल अँटी-फिट सूट, प्रिंटेड शर्ट आणि फ्लेर्ड पॅंट परिधान केले होते. हे कटवर्क आणि प्रिंटमध्ये भारतीय फर्न स्टॉलसह Paired केले होते.

डान्सबाबत सांगायचे झाले तर, ऑल प्रेझेंट्स बिग बोल्ड फॅशन शोकेस दरम्यानप्लस साइज मॉडेल्सनी रनवेला डान्स फ्लोअरमध्ये बदलले. या कलेक्शनबाबत सांगायचे झाले तर थीम खूप चांगली होती, जी सर्व बॉडी टाईपच्या लोकांसाठी उपयोगी ठरणारी होती.

डाय कलेक्शनमध्ये प्रचलित असलेले बरेच तेजस्वी रंग, ट्रॉपिकल टिन्ट्स आणि डिझाईन्सचा समाविष्ट होता. या ब्रँडने फॅशन वीकमध्ये त्याचे Activewear देखील लॉन्च केले.

FDCI आणि पर्ल अकादमी फर्स्ट कट कलेक्शनने त्यांच्या डायस्टोपियाज चिल्ड्रन नावाच्या डिझाइनसह रनवेवर सर्वांचे लक्ष वेधले. फॅशन डिझायनर सिद्धार्थ टायटलरने रनवेवरील स्टिरिओटाईप तोडून फॅशन सादर केली. त्यांचे कलेक्शन हे जपानी टेक्निकल सोमेत्सुक यांच्यापासून प्रेरित होऊन तयार केले होते आणि प्रत्येक डिझाईनमध्ये पिपली, क्रिस्टल दागिने, स्क्विन वर्क, रफल्स आणि डिजिटल प्रिंट यांचा समावेश करण्यात आला होता. त्यांची शैली नेहमीपेक्षा वेगळी होती ज्यामध्ये एका पुरुष मॉडेलने स्कर्ट परिधान केला होता. टायटलरसाठी शॉ स्टॉपर म्हणून अॅक्टर आदित्य सील यांने नोज रिंग (Nose Ring) घालून आपल्या लूकमध्ये काहीतरी नवीन गोष्ट ट्राय केली.

Lakme Fashion Week 2022 : पुरुषाने स्कर्ट घालून का केला Ramp Walk?
Google Earthने शोधल्या गार्डनमध्ये लपवलेल्या चोरीच्या 500 सायकली!

रनवेमध्ये डिझाईनर राहूल सिंह यांच्या कलेक्शनमध्ये जीबा बहार यांनी पेस्टल या रंगाबाबत गोष्ट सांगितली आणि पर्शियन फुलांची नक्षी सर्वांसमोर सादर केली.

मायनाच्या रेनू टंडन आणि निकिता यांच्या कलेक्शन, 'Unveiled I'm Worth It'मध्ये प्रवासासाठी परिपूर्ण फोटो सिल्हूट समाविष्ट होते, त्यात शर्ट ड्रेस, कॅप्टन कट-आउट ड्रेस आणि सुंदर रंगाच्या आणि प्रिंट्समधील डिनर गाउन यांचा समावेश होता.

वसंत ऋतु आणि लग्नाचा हंगाम सुरू झाल्यामुळे, सेजल कामदार, रोमा अग्रवाल, वरुण चक्किलम आणि कीर्ती कद्रे यांच्यासह 6 डिग्रीच्या प्रतिभावान डिझायनर्सनी दिमाखदार वधू आणि उत्सवाचा पोशाखांचे सादरीकरण केले. त्यामुळे या रनवेचे रुपांतर मोठ्या लग्नसोहळ्यात झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com