Leadership Types : लीडरशीपचे असतात 3 प्रकार; तुम्ही कोणत्या प्रकारात?

प्रत्येकात कमी अधिक प्रमाणात नेतृत्व गुण असतो.
Leadership Types
Leadership Typesesakal

3 Types Of Leadership Quality In Marathi : प्रत्येकच माणसात नेतृत्व गुण कमी अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्यातले बलस्थाने आणि कमतरता ओळखून जर आपण त्यावर काम केले तर यशस्वी होण्याचे अनेक पर्याय खुले होतात.

नेतृत्व गुणांचेही प्रकार असतात. आणि विशेष म्हणजे निसर्गतः असलेला हा गुण जर आपण नैसर्गिक लीडर असणाऱ्या प्राण्यांच्या तुलनेत समजून घेतला तर आपल्याला पुढे जाणे अगदीच सोपे होते.

याविषयी मोटीव्हेशनल स्पीकर, ज्योतिष्य आणि वास्तूशास्त्र तज्ज्ञ जाई मदान यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या व्हिडीओत म्हटलं आहे की, प्रत्येक माणूस नेतृत्व करू शकतो. फक्त त्याच्यातल्या त्या गुणांना तो किती वाव देतो आणि कमतरतांवर किती मात करतो यावर त्याचे यश अवलंबून असते. हे यश आपल्याकडे कोणत्या प्रकारचा नेतृत्व गुण आहे हे ओळखून त्यानुसार काम केल्याने टीकवून ठेवणे शक्य होऊ शकते.

त्यासाठी नेतृत्व गुणाचे हे तीन प्रकार कोणते जाणून घेऊया.

Leadership Types
Success Story : घरोघरी वृत्तपत्रे वाटली,अनाथाश्रमात राहीला अन् मिळवली लाल दिव्याची गाडी, विलक्षण जिद्द असलेल्या IAS अधिकाऱ्याची गोष्ट!

जाई मदान यांच्या मते नेतृत्व गुण सिंहासारखे, वाघासारखे किंवा चित्त्यासारखे अशा तीन प्रकारचे असते.

सिंहासारखे नेतृत्व

या प्रकारात सिंह जसा स्वतः शिकार करून आणत नाही. त्याच्यासाठी सिंहीण शिकार करून आणते. सिंह स्वतः काम करत नाही पण काम करवून घेतात. या प्रकारचे लीडर हे स्ट्रॅटेजिकली निर्णय घेतात आणि काम आपल्या टीम कडून करवून घेण्याची त्यांची क्षमता असते.

वाघासारखे नेतृत्व

वाघ स्वतःच शिकार करतो. तो ७-८ दिवसांत एकदाच शिकार करतो. त्याची शिकार करण्याची पद्धत फार विचारपूर्वक असते. दबा धरून बसणे, आपल्याला ७-८ दिवस पुरेल एवढी शिकार शोधणे आणि मग ती खाणे असा हा प्राणी आहे.

या प्रकारचे लीडरही स्वतः कामही करतात आणि एक्झिक्युटही करतात. त्यांनी एक सक्सेस अचिव्ह केल्यावर त्या गोष्टीला ते पुर्णपणे अनुभवतात आणि मग पुढच्या कामाकडे वळतात.

Leadership Types
Success Story : हम भी किसीसे कम नही! म्हणत वाजे विद्यालयातील पोरं निघाले अमेरिकेला...

चित्त्यासारखे नेतृत्व

चित्ता सगळ्यात वेगवान प्राणी आहे. तो आपल्या वेगाच्या जोरावर शिकारपण करतो. पण तो लवकर थकतो. त्यामुळे इतर ताकदवान प्राणी जसं वाघ, सिंह त्याची शिकार हिसकावून घेऊ शकतात. हा प्राणी वेगवान आहे पण मॅरेथॉन रनर्स सारखं बराचवेळ पळू शकत नाही.

अशा प्रकारचे लोकही पटापट पटापट गोष्टी करतात पण लवकर थकतात किंवा कंटाळतात. वेग हे त्यांचे बलस्थान असते. पण एखादी गोष्ट दीर्घकाळ करणे त्यांच्यासाठी कठीण असते. अशावेळी आपले बलस्थान ओळखावे आणि कमतरतांवर मात करण्याचा प्रयत्न करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com