esakal | ऑफिसमध्ये रोज झोप येते? जाणून घ्या त्यामागची खरी कारणं

बोलून बातमी शोधा

ऑफिसमध्ये रोज झोप येते? जाणून घ्या त्यामागची खरी कारणं
ऑफिसमध्ये रोज झोप येते? जाणून घ्या त्यामागची खरी कारणं
sakal_logo
By
शर्वरी जोशी

दिवसभरातील ९ ते १० तासांचा काळ आपण कार्यालयात म्हणजेच ऑफिसमध्ये घालवत असतो. यात अनेकांना दुपारी जेवण केलं की झोप किंवा सुस्ती येते. त्यामुळे सहाजिकच त्याचा परिणाम आपल्या कामावर होतो. डोळ्यांवर झोप असल्यामुळे कामात लक्ष लागत नाही. सुस्ती येत असल्यामुळे मग टाइमपास करण्याकडे कल वाढतो. परंतु, ऑफिसच्या वेळेमध्ये ही झोप नेमकी येते कशी असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळेच ही झोप का येते यामागची काही कारणं आपण जाणून घेणार आहोत.

१. ऑफिसमध्ये झोप येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे आळस. एकदा का काम करतांना आळस आला की झोप हमखास येणार.

२.दुपारी जेवतांना भात खाल्ल्यावर अनेकांना सुस्ती येते आणि त्यातूनच मग पुढे झोप येऊ लागते.

३. सतत फास्टफूडचं सेवन करणे.

४. पिझ्झा, समोसे किंवा अन्य जंकफूड खात असाल तर झोप हमखास येते. कारण, चरबी वाढवणाऱ्या पदार्थांमुळे सुस्तपणा जास्त येतो.

६. रात्री व्यवस्थित झोप न येणे.

७. कामात लक्ष न लागणे.

८. सतत एकाच कामाचा विचार करत राहणे.

९. अपूर्ण व अयोग्य आहार.

दरम्यान, ऑफिसमध्ये येणारी झोप टाळण्यासाठी सकस आणि पौष्टिक आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच एकलकोंडेपणे वावरण्यापेक्षा चार लोकांशी बोला. सतत बोलल्यामुळे ऊर्जा कायम राहते, ज्यामुळे झोप किंवा कंटाळा येत नाही.