उपाशीपोटी चुकूनही करु नका 'ही' ४ काम! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hungry

उपाशीपोटी चुकूनही करु नका 'ही' ४ काम!

कोणतंही शारीरिक वा बौद्धिक (Physical and mental) काम करायचं असेल तर त्यासाठी शरीरात ऊर्जा असणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र, अनेक जण कामाच्या गडबडीत किंवा डाएटच्या नावाखाली स्वत:चीच उपासमार करत असतात. परिणामी, कालांतराने अनेक शारीरिक समस्यांना उद्भवतात. तसंच उपाशीपोटी राहिल्यामुळे दैनंदिन जीवनातदेखील अनेक शारीरिक व मानसिक (Physical and mental) समस्यांना सामोरं जावं लागतं. म्हणूनच रिकाम्यापोटी किंवा उपाशीपोटी राहून कोणती कामं करु नयेत हे आज आपण पाहुयात. (lifestyle health tips when you feel hungry dont do these things)

१ व्यायाम करणे -

काहीही न खाता जर व्यायाम केला तर वजन लवकर कमी होईल असा अनेकांचा समज आहे. परंतु, जर तुम्ही असं करत असाल तर वेळीच थांबा कारण त्यामुळे वजन कमी होण्यापेक्षा अन्य शारीरिक समस्यांना आमंत्रण मिळेल. त्यामुळे कधीही व्यायाम करण्यापूर्वी हलका आहार नक्कीच घेतला पाहिजे.

हेही वाचा: आता इंटरनेट नसतानाही वापरू शकता WhatsApp

२. निर्णय घेणे -

भूक लागल्यावर आपलं कोणत्याच कामात लक्ष लागत नाही. त्यामुळे अनेकदा आपल्याकडून किरकोळ चुका घडतात. तसंच निर्णय घेण्याच्या बाबतीतही होतं. जर पोटात अन्नाचा कण नसेल तर त्यावेळी आपली विचारक्षमता काही काळासाठी थांबलेली असते. त्यातूनच मग आपण चुकीचे निर्णयदेखील घेतो. विशेष म्हणजे गॅस्ट्रोइन्टेस्टायनल टॅक्टमध्ये असणाऱ्या घ्रेलिन नावाचे हार्मोन्स डोक्यातील नसांवर प्रभाव टाकतात. त्यामुळे आपल्या निर्णयक्षमतेवर परिणाम होतो, असं एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे.

३. बोलण्यापूर्वी विचार करा -

अनेकदा भूक लागल्यावर आपली चिडचिड होते. परिणामी, रागाच्या भरात आपण पटकन एखाद्याला अपशब्द किंवा चुकीचं काहीतरी बोलून जातो. म्हणूनच, जर भूक लागली असेल तर शक्यतो शांत रहा किंवा कोणाशीही बोलण्यापूर्वी विचार करा.

४. उन्हात जाऊ नका -

बऱ्याचदा वेळेवर न जेवल्यामुळे अनेकांना अॅसिडीटी किंवा डोकेदुखीचा त्रास होतो. त्यामुळे जर भूकेमुळे तुमचं डोकं दुखत असेल तर शक्यतो उन्हात जाणं टाळा. त्यामुळे आणखी त्रास होण्याची शक्यता असते.

Web Title: Lifestyle Health Tips When You Feel Hungry Dont Do These

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :lifestyle
go to top