esakal | आता इंटरनेट नसतानाही वापरू शकता WhatsApp
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp

आता इंटरनेट नसतानाही वापरू शकता WhatsApp

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सर्वाधिक लोकप्रिय आणि तितकंच गरजेचं झालेलं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp). गेल्या कित्येक दिवसांपासून ही कंपनी त्यांच्या नव्या पॉलिसीमुळे चर्चेत येत आहे. मात्र, आता WhatsApp त्याच्या नव्या फिचरमुळे चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे आता इंटरनेटशिवाय ग्राहक व्हॉट्सअ‍ॅप वेब वर्जन (whatsapp web version) वापरु शकणार आहेत. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वेब वर्जन वापरण्यासाठी तुमच्या फोनमध्ये इंटरनेट सुरु ठेवण्याची आवश्यकता भासणार नाही. (whatsapp users will access whatsapp web version without internet)

मोबाईमध्ये वापरत असलेलं व्हॉट्सअ‍ॅप आपल्याला लॅपटॉप, कम्प्यूटर किंवा अन्य कोणत्या डिव्हाइसवर सुरु करायचं असेल तर त्यासाठी आपल्या मोबाईलचं नेटदेखील सुरु ठेवावं लागत होतं. तरचं हे व्हॉट्सअ‍ॅप पीसी वा लॅपटॉपवर सुरु राहायचं. अन्यथा ते लगेच लॉगआऊट व्हायचं. परंतु, आता मोबाईलमधील नेट बंद केल्यानंतरही तुमच्या पीसीवर व्हॉट्सअ‍ॅप सुरु राहणार आहे. मात्र, त्यासाठी तुमच्या पीसी किंवा लॅपटॉपवर नेट असणं गरजेचं आहे.

हेही वाचा: यापुढे या फोनमध्ये काम करणार नाही व्हॉट्सअ‍ॅप; अशा पद्धतीने करा चॅट्स बॅकअप

HackRead मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, ग्राहकांना आता व्हॉट्सअ‍ॅपच्या वेब वर्जन सुरु करण्यासाठी QR कोड स्कॅन करण्याची गरज नाही. कंपनीकडून सध्या व्हॉट्सअ‍ॅप वेब वर्जनसाठी अॅक्टिव्ह मोबाईल इंटरनेट कनेक्शनचा ऑप्शन बंद करण्यावर काम करत असून लवकरच हे फिचर युजर्ससाठी लाँच करण्यात येणार आहे.

दरम्यान, हे नवीन फिचर मल्टी-डिव्हाइस फिचरचा भाग असल्याचं काही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे मल्टी -डिव्हाइस असलेलं हे फिचर एकाच वेळी मोबाईल नेट नसतांनाही वेगवेगळ्या डिव्हाइसवर सुरु राहू शकतं.

loading image
go to top