esakal | लिक्विड लिपस्टिक लावताना टाळा हमखास होणाऱ्या 'या' पाच चुका
sakal

बोलून बातमी शोधा

लिक्विड लिपस्टिक लावताना टाळा हमखास होणाऱ्या 'या' पाच चुका

लिक्विड लिपस्टिक लावताना टाळा हमखास होणाऱ्या 'या' पाच चुका

sakal_logo
By
शर्वरी जोशी

मेकअप करणं कोणत्या मुलीला आवडत नाही? आपण छान दिसावं, चारचौघात उठून दिसावं असं प्रत्येकीलाच वाटत असतं. त्यामुळे मला बाई मेकअप फारसा आवडत नाही असं म्हणणाऱ्या स्त्रिया किंवा मुली यांनादेखील काही अंशी मेकअप करण्याची थोडीतरी हौस ही असतेच असते. आजकाल लग्नकार्य असो वा एखादी छोटेखानी पार्टी, सोहळा. प्रत्येक स्त्री मेकअप करुनच त्या कार्यक्रमाला हजेरी लावणार. बरं अगदीच मेकअप नाही म्हटलं तरीदेखील लिप्स्टीक तर नक्कीच लावली जाते. आता बाजारातदेखील विविध रंगाच्या, ब्रॅण्डच्या आणि प्रकारच्या लिप्स्टिक पाहायला मिळतात. परंतु, या लिप्स्टीक नेमक्या लावायच्या कशा हा प्रश्न अनेकींना असतो.

सध्या तरुणींची मॅटल किंवा लिक्विड लिप्स्टीकला विशेष पसंती मिळत आहे. परंतु, ही लिप्स्टीक लावतांना अनेकजणी चूक करतात. काही जणी डबल कोट लावतात. तर अनेकदा ओठ एकमेकांवर घासून ती पसरवतात. परंतु, ही चुकीची पद्धत असल्यामुळे तुमची लिप्स्टीक फार काळ टिकत नाही. म्हणूनच, लिप्स्टीक दीर्घकाळापर्यंत टिकवायची असेल तर या काही गोष्टी नक्की फॉलो करा.

१. घाई न करता लिप्स्टीक लावा -

अनेकदा मुली घाई गडबडीत लिप्स्टीक लावतात. त्यामुळे ती ओठांवर नीट लागली जात नाही. त्यामुळे लिप्स्टीक लावतांना वेळ घ्या. कधीही लिक्विड लिप्स्टीक पटकन लावली जात नाही. तिला लावायला वेळ लागतो. तसंच लिक्विड लिप्स्टीक लावण्यापू्वी ओठांवर आऊटलाइन नक्की करा, ज्यामुळे लिप्स्टीक ओठांबाहेर जाणार नाही.

२.लिप्स्टीक लावण्याची योग्य वेळ -

लिप्स्टीक कधीही संपूर्ण मेकअप झाल्यानंतर लावावा. त्यामुळे नेमकी कोणती लिप्स्टीक तुमच्या मेकअपला सूट होते व तुम्हाला खुलून दिसते याचा अंदाज लावता येतो.

३. अतिरिक्त लिप्स्टीक नको -

अनेक जणींना डार्क लिप्स्टीक लावण्याची सवय असते. मात्र, जसजसा दिवस पुढे सरकत जातो तसतसा तुमचा मेकअप उतरत जातो. त्यामुळे मेकअप उतरल्यानंतर चेहऱ्यावर केवळ डार्क लिप्स्टीकच राहते. परंतु, निस्तेज त्वजेवर डार्क रंगाची लिप्स्टीक अत्यंत खराब दिसते. त्यामुळे लिप्स्टीक लाइट लावा. जर तुम्हाला बोल्ड लूक हवा असेल तर डबल कोट लावा किंवा त्यावर लिपग्लॉस लावा.

हेही वाचा: जेवणापूर्वी श्वानांनी केली प्रार्थना;भन्नाट व्हिडीओ व्हायरल

४. ओठांना मॉश्चराइज करा -

लिप्स्टीक लावण्यापूर्वी ओठांवरील मृत त्वचा काढणं अत्यंत गरजेचं आहे. तसं न केल्यास लिप्स्टीक नीट लागणार नाही, तसंच ओठांवरील सालं हळूहळू निघू लागेल. त्यामुळे लिप्स्टीक लावण्यापूर्वी लीपबाम, तूप यांच्या माध्यमातून ओठ मॉश्चराइज करुन घ्या.

५. प्रथम कोणत्या ओठांवर लिप्स्टीक लावाल? -

लिप्स्टीक लावतांना कायम प्रथम खालच्या ओठांवर आधी लावावी. त्यानंतर हलक्या पद्धतीने ओठ एकमेकांवर दाबावेत ज्यामुळे लिप्स्टीक नीट पसरले. तसंच लिप्स्टीक आणि लीप लायनर यांचा रंग सारखाच असेल याची काळजी घ्यावी.

loading image