Bad Dream : तुम्हालाही वाईट स्वप्न पडतात? IRT थेरपी ठरेल लाभदायक

स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा विद्यापीठात यावर एक उपाय शोधण्यात आला आहे.
Bad Dream
Bad DreamSakal
Updated on

Therapy To Over Come From Bad Dream : कधीकधी लोकांना रात्री झोपेत वाईट स्वप्न पडतात. यामुळे झोप मोड होते आणि डोक्यात भलतेच विचार घर करून बसतात. झोपेत पडणाऱ्या या वाईट स्वप्नांमुळे काही लोक इतके अस्वस्थ होतात की, त्यांना निद्रानाश, चिंता आणि तणाव जाणवू लागतो. आज आम्ही तुम्हाला या समस्येवर एक उपाय सांगणार आहोत.

Bad Dream
Astro Tips: रात्री झोपण्यापूर्वी बाथरूममध्ये करा हे काम, पैशाची तिजोरी कधीच रिकामी होणार नाही!
sleep girl
sleep girl

स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा विद्यापीठात नुकत्याच झालेल्या एका अभ्यासादरम्यान अशी एक म्युझिक थेरपीचा शोध लावण्यात आला आहे. ज्यामुळे झोपेत पडणाऱ्या वाईट स्वप्ने पडण्याचे बंद होण्याचे प्रमाण थोडे थोडके नव्हे तर, 4 पट वाढते.

संशोधनानुसार, रात्री झोपताना संगीत ऐकल्याने ही पडणारी भयानक स्वप्ने चांगल्या स्वप्नांमध्ये बदलू शकतात. झोपण्यापूर्वी संगीत ऐकल्याने चांगली झोपही लागते. भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे काम संगीत करते.

Bad Dream
Dream : तुम्हाला लग्नाचे स्वप्न पडत असेल तर वेळीच जागे व्हा, शुभ-अशुभ जाणून घ्या
music
music

विद्यापीठात करण्यात आलेल्या अभ्यासादरम्यान, आठवड्यातून किमान एकदा वाईट स्वप्ने पडणाऱ्या व्यक्तींवर अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. या लोकांना रात्री झोपण्यापूर्वी संगीत ऐकवले गेले. त्यानंतर या व्यक्तीं भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत झाले. संशोधकांनी याला थेरपीला इमेजरी रिहर्सल थेरपी (IRT) असेही म्हटले आहे. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनच्या मते, 4% पेक्षा जास्त अमेरिकन लोक आजच्या घडीला वाईट स्वप्नांमुळे त्रासलेले आहेत.

Bad Dream
Relationship: 'या' गोष्टी वेळीच समजून घ्या नाहीतर लग्न टिकणार नाही

इमेजरी रिहर्सल थेरपीमध्ये चार टप्पे असतात, जे एका दिवसात पूर्ण केले जाऊ शकतात. यामध्ये व्यक्तींना वाईट स्वप्नांबाबतचे प्रत्येक तपशील लिहून ठेवण्यास सांगितले जाते. मात्र, ही लिहिताना ही स्वप्ने सकारात्मक पद्धतीने लिहिण्यास सांगितले जाते. त्यानंतर स्मरणशक्तीमध्ये ही बाब स्थिर होईपर्यंत स्वप्नाचा दररोज 5 ते 20 मिनिटे सकारात्मक रिहर्सल केला जातो. नाईटमेअर डिसऑर्डरने ग्रस्त असलेल्या 18 लोकांना स्वप्नांचा सरावावेळी पियानो ऐकवण्यात आला. यावेळी या व्यक्तींना इतर कोणताही आवाज ऐकू आले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.