- शलाका तांबे, लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक
आपण वर्तमान क्षणात खरंच जगतो का, याचं प्रामाणिक उत्तर आपल्याकडे बहुतेक वेळा नसतं, कारण आपण स्वतःला हा प्रश्न क्वचितच विचारतो. मात्र, हा प्रश्न म्हणजे, ‘स्व’बरोबरच्या संवादातील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे असं म्हणायला हरकत नाही. वर्तमान काळात जगायला पाहिजे, हे आपल्या सर्वांना पटत असतं; पण ते आपण करतोच असं नाही. कारण आपलं मन वर्तमानात सगळ्यात कमी रमतं.