esakal | लॉकडाऊनच्या काळात मांजरींनाही आले नैराश्य, संशोधनाचा निष्कर्ष
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाऊनच्या काळात मांजरींनाही आले नैराश्य, संशोधनाचा निष्कर्ष

लॉकडाऊनच्या काळात मांजरींनाही आले नैराश्य, संशोधनाचा निष्कर्ष

sakal_logo
By
शरयू काकडे

गेल्या 18 महिन्याच्या कोरोना काळात तुम्ही या महामारीचा सामना करताना तुम्हाला प्रंचड मानसिक ताण आला असेल. हळू हळू तुम्ही त्याच्याशी सामना करायाल शिकला. तुमच्या घरी एखादा पाळीव प्राणी असेल तर लॉकडाऊनच्या काळात तुमच्यावर मानसिक आरोग्यावर झालेला परिणाम अशंत: कमी असेल. पण तुमच्या पाळीव प्राण्यांच्या मानसिक आरोग्याचे काय? तुम्ही जर मांजर पाळली असेल तर तुम्हाला तुमच्या मांजरीबाबत आणखी काळजी घ्यायला हवी.

ट्विटरवर काही मांजर प्रेमींच्या एका ऑनलाईन सत्रामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. एका मांजरप्रेमीने सांगितले की, कोरोनाकाळात कुटुंबातील माणसे दिवसभर घरी असल्यामुळे मांजरी वैतागल्या होत्या. तिच्या पशूवैद्य मित्राने अशा कित्येक नैराश्यग्रस्त मांजरीवर उपचार केले होते.'' ही गोष्ट हसण्यासारखी नाही पण, मांजरीबाबत सर्वात जास्त ही गोष्ट ऐकलेली आहे. सहसा कुत्र्यांमध्ये ही लक्षणे दिसत नाही.

संपूर्ण घरामध्ये विनाहस्तक्षेप मांजराचा वावर होत नसल्यामुळे त्या नाराज असल्याचे एका ट्विटर युजर्सने सांगितले. एका युजर्सने त्यावर सहमती दर्शवित मांजरीचा झोपलेला फोटो पोस्ट करत सांगितले की, आमच्या मांजरीसोबतही हेच झाले आहे. आता त्या खूप दूरपर्यंत किंवा खूप वेळ धावत नाही, नेहमी झोपलेल्या असतात.''

हेही वाचा: कोरोनाकाळात गर्भवती महिलांचे मानसिक आरोग्य जपण्याची गरज

एका मांजरप्रेमीने त्यावर उपाय सांगितला की, ''मांजरीना त्यांचा स्वत:चा असा वेळ हवा असतो. मांजरीबाबत एवढी माहिती समजल्यावर एका युजरला तर विश्वासच बसत नव्हता. ''माजंरी फारच कमाल आहेत'' अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

मांजरीना लॉकडाऊनच्या काळात नैराश्य आले हे ऐकून विनोदी वाटत असेल पण संशोधनातूनही ही माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियातील जेम्स कुकमधील युनिवर्सिटीमध्ये 400 पाळीव प्राणी आणि त्यांच्या पालकत्व स्वीकारलेल्या प्राणीप्रेमींनी यामध्ये सहभाग घेतला होता. कोरोनाकाळात एकमेकांसोबत घालवलेल्या वेळाचा त्यांच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला असे संशोधन करण्यात आले. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, कोरोनाकाळात एकमेकांसोबत घालवलेल्या वेळामध्ये कुत्र्यांच्या आणि त्यांच्या मालकांच्या मुडमध्ये सुधारणा झाल्याचे दिसले.

हेही वाचा: Relationship Tips: रुसलेल्या जोडीदाराला मनविण्यासाठी ट्राय करा टिप्स

याउलट चित्र मांजरीच्या बाबतीत दिसत असल्याचे प्रमुख संशोधक डॉ, जेसिका ऑलिव्हिया यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, ''जवळपास 50 टक्के मांजरींच्या पालकांनी त्यांच्या मांजरी ज्या पद्धतीने वागत होत्या त्यानुसार त्या मालकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होत्या.'' तर जवळपास 100 टक्के कुत्र्यांच्या मालकांनी सांगितले की, ''त्यांच्या कुत्र्यांना त्यांचे मालक पुर्ण वेळ घरी असल्याचा खूप आनंद झाला आहे.''

पशुवैद्यकीय वर्तणूकशास्त्रज्ञ स्टेफनी बोर्न्स-वेइल यांनी टफ्ट्स विद्यापीठाच्या वृत्तपत्रासोबत बोलताना स्पष्ट केले की, ''कोरोना काळाता मांजरीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो हे धक्कादायक होते. नेहमी एकट्या राहणाऱ्या मांजरीसाठी अचानक सतत कोणासोबत तरी राहणे, विशेषत: लहान मुलांसोबत राहणे हा खूप मोठा बदल होता. हा बदल स्वीकारायला मांजरींना खूप वेळ लागतो. मांजरींना अपेक्षित नसताना त्यांचा आसपास लोक असले की त्या भारावून जातात.''

हेही वाचा: महिलांनो पाच आरोगाच्या समस्येकडे करु नका दुर्लक्ष

तुम्हाला तुमची मांजर नैराश्यग्रस्त आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर दररोज प्राण्यांची माहिती देणाऱ्या वेबसाईट चेक केल्या पाहिजे. जेव्हा मांजरी सुस्त असतात, काही खात नाही, बरेच काही लपवत असतात किंवा स्वतःकडे लक्ष देणे सोडून देतात तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. तुम्हाला त्यांची काळजीत वाटत असेल आपल्या पशुवैद्याशी बोला आणि काय चालले आहे ते शोधा.

loading image
go to top