esakal | कोरोनाकाळात गर्भवती महिलांचे मानसिक आरोग्य जपण्याची गरज, संशोधनाचा निष्कर्ष
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाकाळात गर्भवती महिलांचे मानसिक आरोग्य जपण्याची गरज

कोरोनाकाळात गर्भवती महिलांचे मानसिक आरोग्य जपण्याची गरज

sakal_logo
By
शरयू काकडे

कोरोनाकाळात गर्भवती राहिलेल्यांपैकी तीन चतुर्थांश महिलांमध्ये उच्च पातळीची अस्वस्थता निर्माण झाली असून पाच पैकी एक महिलेमध्ये नैराश्याची लक्षणे दिसतात.त्यामुळे महिलाच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. जर्नल कॅनेडियन फॅमिली फिजिशियनमध्ये या संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित झाले आहे.

संशोधकांनी कोरोना काळात युनिटी हेल्थ टोरंटोच्या डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली 1500 गर्भवती महिलांचे ऑनलाईन मुल्यांकन केले. त्यापैकी 87 टक्के महिला कॅनडीयन होत्या. जवळपास 69 टक्के महिलांनी त्या मध्यम ते गंभीर स्वरुपाच्या अस्वस्थतेमध्ये असल्याचे सांगितले तर 20 टक्के महिलांनी त्यांच्यामध्ये नैराश्याची लक्षणे दिसून आल्याचे सांगितले.

हेही वाचा: Relationship Tips: घटस्फोटीत जोडीदाराला डेट करणं नसतं सोपं

कोरोनाकाळात कुटुंबावर झालेला परिणामाबाबतचा निष्कर्ष

सेंट मायकेल हॉस्पिटल ऑफ युनिटी हेल्थ टोरंटो येथे कौटुंबिक चिकित्सक आणि कौटुंबिक औषध प्रसूतिशास्त्राचे अध्यक्ष आणि संशोधनाचे प्रमुख लेखक डॉ.ताली बोगलर म्हणाले, लोकांमध्ये असलेली उच्च पातळीची अस्वस्थता पाहता मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेकीत होते. समोर आलेल्या निष्कर्षावरून सर्वसाधारणपणे साथीच्या रोगाचा कुटुंबांवर होणारा एकूण परिणाम आणि याचा प्रभाव देखील अधोरेकीत होतो.

साथीच्या रोगाच्या आधी गर्भवती महिलांमधील अस्वस्थेच्या पातळीबाबतच्या तुलनात्मक माहितीच्या अभावामुळे हे संशोधन मर्यादित होते. मात्र, कोरोना काळापुर्वी जपानमधील लोकसंख्येवर आधारित सर्व्हेनुसार 28 ते 32 टक्के गर्भवती महिलां नैराश्यामध्ये होत्या. गर्भवती असलेल्या महिलांमध्ये इतकी अस्वस्थतेमागील कारण काय हे संशोधकांना जाणून घ्यायचे होते. हे शोधण्यासाठी त्यांनी संशोधनात सहभागी झालेल्यांना 27 चिंतांची यादी दिली होती आणि प्रत्येक विषयावर ते किती चिंतीत आहे हे दर्शविण्यासाठी रेटींग देण्यास सांगितले होते.

हेही वाचा: महिलांनो पाच आरोगाच्या समस्येकडे करु नका दुर्लक्ष

पहिल्यांदा पालक होणाऱ्या किंवा एका पेक्षा जास्त मुलांचे पालकांची चिंता वेगवेगळ्या

प्रसुती काळात महिलेला आधार देण्याबाबतच्या हॉस्पिटलच्या पॉलिसी, जवळच्या नातेवाईकांना बाळाला भेटून न देणे, गर्भवती असताना कोरोनामुळे आजारी पडण्याबाबत, प्रसुती नंतरच्या काळात कुटुंब, मित्र-मैत्रिणींवर अवलंबून न राहता येणे, कोरोनाकाळातील गर्भधारणेबाबतची परस्परविरोधी माहिती, हे पाच गोष्टींची काळजी गर्भवती महिलांमध्ये जास्त होती. पहिल्यांदा पालक होणाऱ्या किंवा एका पेक्षा जास्त मुलांचे पालकांची चिंता वेगवेगळ्या आहेत. पहिल्यांदा पालक झालेल्याना हॉस्पिटलच्या फेऱ्यांची सर्वात जास्त चिंता वाटत होती तर घरातील मोठ्या बाळाकडून नवजात बालकाला कोरोना संसर्ग होण्याबाबतची चिंता एका पेक्षा जास्त मुलांचे पालकांना होती.

loading image
go to top