
Om Namah Shivaya: महाशिवरात्रीला महादेवाला पांढरी चाफ्याची फुले, रुईची फुले, गोकर्णाची फुले, केवडा आणि बेलाच्या पानांना खूप महत्त्व आहे. यामध्ये भोलेनाथ, शंभू महादेवाला बेलाची पाने खूप प्रिय आहेत. म्हणूनच शंकराच्या पूजेमध्ये बिल्वपत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. भक्तिभावाने ‘ॐ नमः शिवाय’ हा मंत्र जपून बिल्वपत्र वाहिले जाते.
भगवान शंकराला बेलपत्र का अर्पण करतात, याविषयी पुराणांमध्ये उल्लेख आहे. कासारी बाजार येथील बालाजी मंदिरातील वेदशास्त्रसंपन्न प्रवीण कुलकर्णी गुरुजी म्हणाले, की ‘त्रिदलं त्रिगुणाकाराम त्रिनेत्रचं त्रियायुधम। त्रिजन्मपापं संहारकं एक बिल्वमं शिवार्पणम’ श्री शंभू महादेवाला दररोज, सोमवारी १०८ बेलपाने व बेलफळ वाहतात.