Luana Sandin : हॉट कपड्यांवर जाऊ नका, ही प्लेबॉय मॉडेल कुंडली मिळाल्याशिवाय डेटही करत नाही!

प्रत्येक व्यक्तीच्या जोडीदाराच्या निवडीबाबत स्वतःच्या आवडीनिवडी असतात.
Luana Sandin
Luana Sandinesakal

Luana Sandin : प्रत्येक व्यक्तीच्या जोडीदाराच्या निवडीबाबत स्वतःच्या आवडीनिवडी असतात. काहींना जोडीदाराने त्यांच्या स्वभावाशी जुळणारे हवे असते, तर काहींना बौद्धिक पातळीशी जुळणारे हवे असते, परंतु एका प्रसिद्ध मॉडेलची प्रायॉरिटी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आजच्या काळातील मॉडर्न लेडी असूनही, तिला डेटिंगपूर्वी तिच्या जोडीदाराशी कुंडली जुळवायला आवडते.

Luana Sandin
Travel Tips : हिवाळ्याच्या सुट्यांमध्ये कुठे जायचा प्रश्न पडलाय? अंदमानमधल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या

लुआना सँडिन असे या मॉडेलचे नाव आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, लुआना सँडियनने प्लेबॉय सारख्या पुरुषांच्या मासिकांसाठी मॉडेलिंग केले आहे, परंतु जेव्हा डेटिंग आणि रिलेशनशिपचा प्रश्न येतो तेव्हा ती प्रथम राशिचक्र आणि कुंडलीवर विश्वास ठेवते. असे नाही की तिने याआधी मुलांना डेट केले नाही, पण आता तिने स्वतःच्या विचारांना प्राधान्य दिले आहे.

Luana Sandin
Heart Attack : पहाटे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण का जास्त असते?

जर तुम्हाला डेट करायचे असेल तर तुमची कुंडली आणा

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, परंतु मॉडेलिंगसारख्या मॉडर्न करिअरमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या लुआना सॅन्डियनचा गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपच्या बाबतीत माणसांपेक्षा तिच्या ग्रह आणि नक्षत्रांवर जास्त विश्वास ठेवत आहे. ती अनेक वर्षांपासून हे करत आहे आणि त्यात ती समाधानी आहे. लुआना म्हणते की ती ज्योतिषीय चार्ट बनवल्यानंतरच स्वतःसाठी जोडीदार निवडते. ती म्हणते की राशिचक्र कधीही खोटे बोलत नाही. भले ती फोनवर कोणाशी बोलत असली तरी तिच्या ग्रह आणि नक्षत्रांबाबत तिचे संशोधन सुरूच असते.

Luana Sandin
Breakfast Recipe : एगलेस ऑम्लेट खाल्ले आहे का? एकदा खाल तर अंड्याचे ऑम्लेट विसराल

लुआनाच्या मते, कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्रांच्या खेळाचा तुमच्या जीवनावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत जर एखाद्या पुरुषाची जन्मकुंडली तिच्या जन्मपत्रिकेशी जुळली तरच डेटला जायचं की नाही हे निश्चित होते. ती म्हणते की तिला नेहमीच निसर्गाशी आणि जीवनातील रहस्यांचे आकर्षण वाटत आले आहे आणि तिच्या मते सर्व काही नियतीच्या इच्छेनुसार घडते. नशीब आणि ज्योतिषावर तिचा खूप विश्वास आहे आणि हेच ती तिच्या व्यक्तिमत्त्वाची खासियत मानते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com