
Rare Celestial Event To Occur At The End Of Mahakumbh 2025: 13 जानेवारीपासून जवळपास दीड महिना सुरु असलेला महाकुंभ मेळा २६ फेब्रुवारीला समाप्त होणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी महाकुंभ मेळ्याचा शेवटचा दिवस आहे आणि याच दिवशी महाकुंभ मेळ्याचे शेवटचे स्नानही आहे. परंतु या व्यतिरिक्त एक दुर्मिळ आणि नयनरम्य खगोलीय घटना घडणार आहे, जिथे आपल्या सूर्यमालेतील सातही ग्रह; बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनि, युरेनस आणि नेपचून रात्री आकाशात एकाच वेळी दिसणार आहेत.