

Mahaparinirvan Din 2025:
Sakal
Mahaparinirvan Din 2025: दरवर्षी 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. या दिवशी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुणतिथीचा दिवस आहे. देशभरात हा दिवस मोठ्या आदराने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीत निधन झाले. त्यानंतर 7 डिसेंबरला मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे दरवर्षी 6 डिसेंबरला देशभरातून मोठ्या संख्यने अनुयायी चैत्यभूमीवर एकत्र येतात. महान कार्याची आठवण ठेवण्यासाठी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो.