
Maharashtra Din 2025: सध्या सर्वत्र महाराष्ट्र दिनाचा आणि कामगार दिनाचा उत्साह पहायला मिळतोय. दरवर्षी १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राला समृद्ध असा इतिहास आणि परंपरा लाभल्या आहेत. महाराष्ट्राची भूमी ही संतांची, महात्म्यांची, शूरवीरांची, गडकिल्ल्यांची, कवी-लेखकांची, लोककलेची आणि प्राचीन अशा इतिहासाची आहे. या सगळ्यांमुळे महाराष्ट्र हे राज्य सगळ्या राज्यांपेक्षा वेगळे ठरते.