Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

Maharashtra Din Special Food : १ मे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘कामगार दिन’ म्हणून राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Maharashtra Din 2024
Maharashtra Din 2024esakal

Maharashtra Din 2024 : १ मे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ (Maharashtra Din) आणि ‘कामगार दिन’ म्हणून राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सध्या या महाराष्ट्र दिनाचा आणि कामगार दिनाचा सर्वत्र उत्साह पहायला मिळतोय. महाराष्ट्र ही भूमी शूरवीरांची, गडकिल्ल्यांची, कवी-लेखकांची आणि समृद्ध अशा इतिहासाची आहे.

महाराष्ट्राची परंपरा, खाद्यसंस्कृती आणि पर्यटन जगभरात प्रसिद्ध आहे. १ मे ला बुधवारी महाराष्ट्र दिन राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. या महाराष्ट्र दिनानिमित्त आपण महाराष्ट्रातील खास पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत. जे जगभरात प्रसिद्ध आहेत.

वडापाव

महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय स्ट्रीट फूड म्हणून वडापावला ओळखले जाते. हा पदार्थ चवीने खाल्ला जातो. तेलात तळलेला बटाटेवडा पावाला खमंग चटणी लावून खाल्ला जातो. सोबतीला तळलेल्या हिरव्या मिरच्यांचा आस्वाद घेतला जातो. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये, स्नॅक्समध्ये हा वडापाव आवर्जून खाल्ला जातो. देश-विदेशातील असंख्य पर्यटक महाराष्ट्रात आल्यावर या पदार्थाचा आस्वाद घेतल्याशिवाय जात नाहीत.

पुरणपोळी

महाराष्ट्रातील हा गोड पदार्थ चवीने खाल्ला जातो. सण-समारंभाना हा पदार्थ हमखास बनवला जातो. हरभरा डाळ आणि गुळापासून बनवली जाणारी ही पुरणपोळी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. या पुरणपोळीसोबत आमटी-भात, गुळवणी, भजी आणि कुरडई असा बेत केला जातो.  

झुणका-भाकरी

मराठी घरांमधील अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे झुणका-भाकरी होय. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात हा पदार्थ हमखास बनवला जातो. या झुणक्याला पिठलं असे ही म्हटले जाते. बेसनपीठासोबत कांदा, हिरवी मिरची, तेल, जिरे-मोहरी यांच्या मदतीने हा सोपा आणि चविष्ट पदार्थ बनवला जातो. या झुणक्यासोबत बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी खाल्ली जाते आणि तोंडी लावण्यासाठी कांदा खाल्ला जातो.

मोदक

महाराष्ट्रातील आणखी एक लोकप्रिय गोड पदार्थ म्हणजे मोदक होय. आजकाल मोदकांमध्ये असंख्य प्रकार पहायला मिळतात. तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ, गुळ आणि खोबऱ्याचा किस वापरून हे चविष्ट मोदक घरोघरी बनवले जातात. गणेशोत्सवात तर या मोदकांना मोठी मागणी असते. महाराष्ट्रात आल्यावर मोदक खायला अजिबात विसरू नका.

कांदेपोहे

महाराष्ट्रातील आणखी एक लोकप्रिय नाश्त्याचा पदार्थ म्हणजे कांदेपोहे होय. सकाळच्या किंवा सायंकाळच्या नाश्त्यामध्ये हमखास कांदेपोहे बनवले जातात.

मिसळपाव

महाराष्ट्रात चवीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे झणझणीत आणि तर्रीदार मिसळपाव होय. मटकीपासून बनवली जाणारी मिसळ, सोबतीला फरसाण, रस्सा आणि दही असा खास बेत केला जातो. ही मिसळपाव सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा सायंकाळच्या नाश्त्यामध्ये आवर्जून खाल्ली जाते. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मिसळपावचे अनेक प्रकार पहायला मिळतात.

भरली वांगी

महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात चवीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे भरली वांगी होय. भरली वांगी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाल्ली जातात. भरली वांगीची ग्रेव्हीची भाजी किंवा रस्सा भाजी देखील केली जाते. भातासोबत ही भाजी सुरेख लागते. विविध मसाल्यांचा वापर करून ही भरली वांग्याची भाजी बनवली जाते.

पावभाजी

पावभाजी हा आणखी एक चविष्ट पदार्थ महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध असलेला हा पदार्थ घरोघरी देखील बनवला जातो. पावभाजीमध्ये विविध भाज्या एकत्रितपणे शिजवल्या जातात. त्याला टोमॅटो, कांद्याची मस्त फोडणी दिली जाते. हा स्वादिष्ट पदार्थ पावाला बटर लावून आवडीने खाल्ला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com