Mahavir Jayanti 2024
Mahavir Jayanti 2024Sakal

Mahavir Jayanti 2024: तीर्थंकर भगवान महावीर

Mahavir Jayanti 2024: महावीरांनी सर्वांनाच ‘जगा आणि जगू द्या’ असा उपदेश दिला.
Published on

सुमन श्रीहंस कुरकुट

न धर्म अनादी आहे. या धर्मामध्ये २४ तीर्थंकर झाले. तीर्थंकर हे अवतारी पुरुष असत नाहीत. ते पुन्हा संसारी बनत नाहीत. प्रत्येक चतुर्थ कालात भरत व ऐरावत क्षेत्रात चोवीस तीर्थंकर होतात, ते धर्माचा प्रचार व प्रसार करतात.

त्यांच्यामुळे जीवन धर्माची अहिंसा, धर्माची प्रभावना होत असते. भरत क्षेत्रामध्ये चोवीस तीर्थंकर झाले आहेत. त्यापैकी शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर होय. बिहारमधील वैशालीनगरात भगवान महावीरांचा जन्म चैत्र शुद्ध त्रयोदशीला झाला. ते लहानपणापासून अत्यंत विवेकी व तीक्ष्ण बुद्धीचे होते. त्यांच्या जन्मापूर्वीपासून नगरीतील सर्व लोकांचे धन व सुख वाढू लागले. त्यामुळे लोक त्यांना वर्धमान म्हणू लागले.

त्यांचे आयुष्य ७२ वर्षांचे होते. त्यांच्या शरीराची उंची सात हाथ, सोन्याप्रमाणे तेजस्वी कांती होती. त्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या घटनांमुळे वीर-वर्धमान, सन्मती, महावीर, अतिवीर आणि महती महावीर या नावांनी ते प्रसिद्ध झाले. ते बालब्रह्मचारी यती होते.

आठव्या वर्षी अणुव्रताचा स्वीकार केला. संसारापासून विरक्त झाले. वैराग्य भावना दृढ झाली, ते उदासीन झाले. वयाच्या ३० व्या वर्षी दीक्षा घेतली. लोकांतिक देवानी वैराग्याची स्तुती केली. देवांनी स्वर्गातून चंद्रप्रभा नावाच्या पालखीत बसून ज्ञानवनात गेले.

उत्तरा नक्षत्रावर शालवृक्षाखाली बसून पंचमुण्ढी लोच केला स्वतःच जीनदीक्षा घेतली. सर्व वस्त्राभूषणाचा त्याग केला. मुनीपद धारण करून तीन दिवसांचा आवास करून ध्यानस्थ बसले. बारा वर्षे मौनपूर्वक विहार केला. त्यांनी खूप मोठी तपश्‍चर्या केली. त्यांना केवलज्ञानाची प्राप्ती झाली, त्यावेळी त्यांचे वय ४२ वर्षांचे होते.

Mahavir Jayanti 2024
Mahavir Jayanti 2024: महावीरांच्या तत्त्वज्ञानात स्त्री-पुरुष समानता

समवशरणाची रचना झाली, चार हाती कर्माचा क्षय झाला. ते अरिहंत बनले. ६६ दिवस दिव्यध्वनी खिरली नाही. नंतर इंद्रभूती दीक्षित झाले. गणधरपदावर आरूढ झाले. भगवान महावीरांची दिव्यध्वनी खिरली. भगवान महावीरांच्या समोशरणात राजा श्रेणिक मुख्य श्रोता प्रमुख गणधराचे नाव गौतम होते. प्रमुख आर्यिकेचे नाव चंदनामती होते.

महावीरांनी सर्वांनाच ‘जगा आणि जगू द्या’ असा उपदेश दिला. त्यांच्या समोशरणात १४ हजार मुनी ३६ हजार आर्यिका, एक लाख श्रावक, तीन लाख श्राविका असंख्यात देवी-देवता संख्यात तीर्थच होते. ७२ व्या वर्षी विहार करता करता ते पावापुरीला पोचले. आश्‍विन वद्य त्रयोदशीला धनद नावाच्या यक्षाने विधीपूर्वक समोशरणाची पूजा केली व त्याचे विघटन केले. आश्‍विन वद्य पहाटेला अघातिया कर्माचा क्षय करून ते मोक्षपदाला प्राप्त झाले. त्याच दिवशी गौतम गणधराला सायंकाळी केवलज्ञानाची प्राप्ती झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com