

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीचा सण उद्या (१५ जानेवारीला) देशात साजरा केला जाणार आहे. संक्रांतीपूर्वी आज देशात भोगी आणि लोहरीचा उत्साह पहायला मिळत आहे. आता सण-समारंभ आले की त्यासाठी महिला वर्गाची खास तयारी ही आलीच.
मकर संक्रांतीनिमित्त महिलांना साडी, ज्वेलरी, हलव्याचे दागिने, हेअरस्टाईल आणि मेकअपची खास तयारी करावी लागते. आज आम्ही तुम्हाला खास मकर संक्रांतीनिमित्त काही मेकअप टीप्स देणार आहोत. कोणत्या आहेत त्या मेकअप टीप्स? चला तर मग जाणून घेऊयात.
हिवाळ्यात पारंपारिक लूकसोबत जास्तीचा डार्क मेकअप करणे हे थोडे कठीण असते. कारण, या दिवसांमध्ये आपली त्वचा कोरडी पडते. त्यामुळे, या कोरड्या त्वचेवर जास्त हेव्ही मेकअप करणे अवघड होऊन बसते.
मात्र, जर तुम्हाला पारंपारिक लूकसोबत नैसर्गिक लूक हवा असेल तर, ब्लशचा वापर करायला विसरू नका. ब्लशचा वापर केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर रेग्युलर फाऊंडेशनचा टच द्या.
पारंपारिक साडी किंवा अन्य आऊटफीट्सवर तुम्ही मॅट लूक निवडू शकता. कारण, पारंपारिक लूकवर हा मॅट मेकअप अधिक उठून दिसतो. मॅट मेकअप लूकमुळे तुमचा मकर संक्रांती लूक हा परफेक्ट दिसण्यास मदत होईल.
मॅट मेकअपमुळे तुमची स्किन ग्लोईंग आणि नैसर्गिक दिसते. मात्र, हा मेकअप लूक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी आधी तुमच्या स्किनटोनला तो सूट होईल का? याची एकदा खात्री करा.
पारंपारिक साडी किंवा पारंपारिक आऊटफिट्सवर डार्क लिपस्टिक नेहमीच शोभून दिसते. संक्रांतीच्या सणासाठी तुम्ही काळ्या रंगाची साडी नेसा किंवा इतर कोणत्याही रंगाची नेसा. त्यावर तुम्ही लाल किंवा चॉकलेटी रंगाची डार्क लिपस्टिक लावायला विसरू नका. यामुळे, तुमचा मेकअप परफेक्ट दिसेल.
पार्टीवेअर किंवा फेस्टिव्ह लूकसाठी तुम्ही शिमरी आयशॅडोजचा वापर नेहमीच करता. डोळ्यांवर हे शिमरी आयशॅडोज अधिक खुलून दिसतात, यात काही शंका नाही. तुम्ही सुद्धा संक्रांतीच्या पारंपारिक साडीवर मॅच होणाऱ्या शिमरी आयशॅडोजचा वापर नक्कीच करू शकता. सिल्वर किंवा गोल्ड रंगाचे शिमरी आयशॅडोज पारंपारिक लूकवर अधिक सुंदर दिसतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.