गोरी त्‍वचा मिळवण्यासाठी घरामध्येच बनवा बदाम क्रीम; सुरकुत्यापासून मिळेल मुक्तता

Make almond cream at home to get white skin tips marathi news
Make almond cream at home to get white skin tips marathi news

कोल्हापूर : त्वचेवर दिसणाऱ्या सुरकुत्या पासून मुक्त होऊन तुम्हाला जर गोरी त्वचा पाहिजे असेल तर घरातच तुम्ही सहजपणे बदाम क्रीम बदलू शकता आणि आपली त्वचा उजळू शकता.
तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आलेल्या आहेत आणि यामुळे तुमची जर सुंदरता कमी झाली असेल आणि ही समस्या मिटवून तुम्हाला जर त्वचा गोरी पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच एक वेगळा प्रयोग करू शकता.

तुम्ही बाजारातील अनेक क्रीमचा वापर केल्यानंतरही या समस्येपासून मुक्त होत नसाल तर तुम्हाला काळजी करण्याचे काहीही कारण नाही. कारण आम्ही तुम्हाला आज या ठिकाणी बादाम क्रीम घेऊन आलो आहोत जे आपण घरामध्ये सहजपणे बनवू शकता आणि त्वचेला  लावू शकता.


घरामध्ये बनवलेल्या या बदाम क्रीम मुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग तसेच मुरूम आणि सुरकुत्या सहजपणे कमी होतात आणि आपल्या चेहऱ्याला एक वेगळा लुक येतो. आणि रंग ही उजळतो. त्याच बरोबर बदाम क्रीम हे त्वचेला आवश्यक पोषक तत्वे ही देते. सूर्यकिरणांपासून त्वचेवर होणाऱ्या परिणामापासून  वाचवते त्यामुळे त्वचेला अधिक उष्णता लागणे अथवा सूज येणे या गोष्टी कमी होतात.


बदाम मध्ये असलेल्या फॅटी ॲसिड मुळे तुमच्या त्वचेवरील तेलकटपणा कमी होतो. त्याचबरोबर पिंपल्स आणि चेहऱ्यावरील काळे डाग यापासून संरक्षण होते. बदामाची क्रीम लावल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर लगेच फरक जाणवू लागतो आणि सर्व घटक नैसर्गिक असल्यामुळे कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत.

आवश्यक साहित्य
 
बदाम पाच ते दहा
गुलाब पाणी एक मोठा चमचा 

एलोवेरा जेल एक मोठा चमचा 
बदाम तेल अर्धा छोटा चमचा

.तयार करण्याची आणि लावण्याची पद्धत

घरामध्ये बदाम क्रीम तयार करण्यासाठी सर्वात पहिला बदाम 15 ते 20 मिनिटे पाण्यामध्ये भिजवा. वीस मिनिटानंतर चांगल्या पद्धतीने त्यावरचे आवरण काढून घ्या. त्यानंतर हे बदाम मिक्सर मध्ये घालून त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा. चांगल्या पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक झाल्यानंतर ते गाळून त्याचे पाणी काढा. त्यामध्ये एलोवेरा जेल आणि बदाम ची तेल मिक्स करा. सर्व साहित्य एकत्र चांगल्या पद्धतीने मिक्स केल्यानंतर ते डब्यामध्ये घालून ठेवा. हे रात्री झोपताना किंवा सकाळी आपल्या चेहऱ्याला लावून घ्या. तयार झालेले मिश्रण आपण एक ते दोन आठवडे फ्रीजमध्ये ठेवू शकतो.

होममेड बदाम क्रीमचे फायदे

बदाम क्रीम आपल्या त्वचेवर अद्भुत पद्धतीने काम करते. त्वचेवरील काळे डाग सुरकुत्या कमी करते. आणि आपली त्वचा गोरी बनवते. घरात तयार केलेल्या बदाम क्रीम मुळे त्वचा मऊ बनते. हे क्रीम त्वचेवरील नवीन पेशी तयार होण्यासाठी मदत करते आणि त्याचे रंग सुधारते .बदाम मध्ये विटामिन आणि अन्य अँटी अक्सिडेंट असतात जे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच त्वचा अधिक उजळ होण्यासाठी ही मदत होते.

डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com