कस्तुरी हळदीचा वापर करून बनवा सुंदर निखळ चेहरा

Make beautiful smooth face using musk turmeric tips marathi news
Make beautiful smooth face using musk turmeric tips marathi news


Make beautiful smooth face using musk turmeric tips marathi news

कस्तुरी  हळदीचा वापर करून बनवा सुंदर निखळ चेहरा

तुमचा चेहरा तुम्हाला उजळ पाहिजे असेल आणि तोही कोणत्याहि डागा शिवाय तर कस्तुरी आणि हळदीचा अशा पद्धतीने वापर करा. जाणून घ्या या वापराचे फायदे 


कोल्हापूर : जर तुम्ही विज्ञानाच्या बदलत्या दुनियेत काम करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल कि हळूहळू हळद चे किती फायदे आपल्या शरीरासाठी आहेत. सर्दी आणि खोकला पासून कॅन्सर पर्यंत आणि हृदयांच्या आजारा पर्यंत हळद हे अत्यंत गुणकारी आणि सुरक्षित आहे. त्याचबरोबर कस्तुरीचाही वापर आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कस्तुरी मंजिल याला जंगली हळद या नावानेही ओळखले जाते. नैसर्गिक रित्या स्वच्छ आणि सुंदर त्वचेसाठी आयुर्वेदिक ब्युटी प्रॉडक्ट मध्ये वापरले जाणारा एक अद्भुत घटक म्हणजे कस्तुरी मंजल आहे. जंगली हळदीचा उपयोग जास्त करून ब्युटी प्रॉडक्ट मध्ये केला जातो. ही हळद अखाद्य रूपात आहे. याचा वापर त्वचेवरील डाग नाहीशी करण्यासाठी होतो. त्याचबरोबर यामुळे त्वचेसाठी अद्भुत गुण यामध्ये असतात हे जंगली हळद आपल्या त्वचेवरील सूर्यकिरणांचा परीणाम त्याचबरोबर प्रदूषण आणि अन्य हानी होण्यापासून वाचवतो.


जंगली हळद हे त्वचेवर चमकणाऱ्या गुणासाठी महत्त्वपूर्ण आहे. या हळदीमुळे डल झालेली त्वचा अधिक चमकदार तसेच त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या कमी होतात. याशिवाय जंगली हळद हे अॅटी बॅक्टरियल आणि अॅटी मायक्रोबियल असते. जे त्वचेवर फुटकुळ्या  उठण्यापासून वाचवते. तसेच त्वचेच्या खोलवरच्या पेशी स्वच्छ करते.
 हळद मध्ये त्वचेला चमक येणारे गुण असतात. त्यामुळे त्वचा अधिक तजेलदार दिसते. यासाठीच आम्ही आपल्याला जंगली हळद आणि हळद याचा वापर करून त्वचा अधिक चमकदार कशा पद्धतीने करता येते ही माहिती देत आहोत. 


किचन मधील हळद आणि जंगली हळद मधील फरक:

किचन मधील हळदीमुळे आपल्या त्वचेवर डाग पडू शकतात आणि आपल्या त्वचेला त्याचा त्रास होतो. तर जंगली हळद हे एक चांगल्या गुणवत्तेचे असते आणि त्यामुळे त्वचेवर डाग पडत नाहीत. जंगली  हळद खाद्य साठी वापरत नाहीत परंतु ब्युटी प्रॉडक्ट मध्ये याचा जास्त वापर होतो.
 

1)हळदी चे फेस पॅक आणि बॉडी क्लिंजर


आवश्यक साहित्य 
बेसन पाव कप
 ओटस पावडर दोन मोठे चमचे
 जंगली हळद एक मोठा चमचा
एक हजार मध्ये सर्व पावडर एकत्र करून त्याला बनविण्याचे

पद्धत
एका जारमध्ये सर्व पावडर चांगल्या पद्धतीने मिक्स करून ठेवा. ही पावडर कोरड्या जागेत ठेवा. जेव्हा तुम्ही वापर करणार असाल तेव्हा एलोवेरा किंवा गुलाब पाणी अथवा फिल्टर पाण्यात एक  चमचा पावडर त्यामध्ये घाला.  झालेली पेस्ट चेहर्‍यावर आणि अंगावर लावा पाच मिनिटानंतर ते पाण्याने स्वच्छ करा.


2) हळदीचे फेस पॅक 
आवश्यक साहित्य 
तांदळाचे पीठ एक मोठा चमचा 
जंगली हळद एक चमचा 
दही आवश्यकतेनुसार


बनवण्याची पद्धत

आपल्या त्वचेचा टोन चांगले ठेवण्यासाठी आणि त्वचेला नैसर्गिक रित्या चमक येण्यासाठी या मास्कचा वापर करा. पेस्ट तयार करताना दही मध्ये दोन्ही पावडर चांगल्या पद्धतीने मिक्स करा ते आपल्या चेहऱ्यावर आणि अन्यत्र  लावा पंधरा मिनिटानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा.त्वचाआपले वय वाढत जाते तस तसे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या तसेच रेषा दिसू लागतात. यामुळे आपले वय अधिक दिसते. जंगली हळदी मुळे त्वचा कोमल आणि मुलायम बनते. तसेच त्वचेवरील सुरकुत्या कमी करते. याचा नियमित वापर केल्यामुळे त्वचे वरील आपल्याला नको असलेले प्रभाव कमी होतात.

तेलकट चेहऱ्यासाठी चांगले
तेलकट त्वचा आपल्या चेहऱ्यावर मुरूम काळे डाग यासाठी अधिक कारणीभूत ठरते. संत्रा चे रस आणि चंदन पावडर बरोबर कस्तुरी हळदीचा वापर केल्यामुळे ही समस्या कमी होते. एक चिमूट हळदी बरोबर एक चमचा चंदन पावडर आणि तीन चमचा संत्र्याचा रस एकत्र करून हे फेस पॅक तयार करता येतो. ही पेस्ट चेहऱ्यावर पंधरा मिनिटे लावावी. चंदन पावडर  त्वचा चे चित्र उघडे करून आतील नको असलेले घटक बाहेर टाकण्यासाठी मदत करते. याच बरोबर संत्र्याचे रस आणि कस्तुरी हळद त्वचेवरील डाग कमी करतात.

त्वचेचा रंग उजळतो
 कस्तुरी मंजन दही किंवा दुधा बरोबर लावल्यामुळे त्याच्या अधिक खुलून दिसते. त्याचबरोबर त्वचेवरील दाग घालवते  आपली त्वचा अधिक गोरे आणि चमकदार बनण्यासाठी मदत करते.

काळ्या वर्तुळ पासून मुक्ती
आपल्या डोळ्या च्या खाली काळे डाग गोलाकार स्वरूपात उठतात. जंगली हळद हे रंग हलके करण्यासाठी मदत करते यामुळेच काळे वर्तुळ जवळ ही पेस्ट लावल्यामुळे डाग कमी होण्यास मदत होते. आपल्या त्वचेच्या अन्य समस्या साठी जंगली हळदीचा वापर अत्यंत गुणकारी ठरतो हळद बाजारात सहजपणे उपलब्ध होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com