काळ्या डागांसाठी मेकअप
काळ्या डागांसाठी मेकअपEsakal

Makeup Tips: मेकअप करूनही चेहऱ्यावरील काळे डाग दिसतायत? मग या टिप्स तुमच्यासाठी

चेहऱ्यावरील डागांमुळे नेमका कसा मेकअप करावा हे अनेकींना कळत नाही. मात्र काही साध्या ट्रीक्स आणि स्पेप्टच्या मदतीने हे काळे डाग लपवणं शक्य आहे.

चेहऱ्यावर मुरूम किंवा पिंपल्स येणं हे तसं नवं नाही. मात्र एखाद्या समारंभाला किंवा पार्टीला जाताना या पिंपल्सची किंवा चेहऱ्यावरील डागांची मोठी अडचण निर्माण होते. समारंभ किंवा पार्टी म्हंटलं तर महिलावर्गाला नटूनथटून जायला आवडतं. त्यात साधा का होईना मेकअप करणं सगळ्यांनाच आवडतं. Make Up Tips in Marathi Hide Black Spots or Pimples on Face

मात्र बऱ्याचदा मेकअपMake Up करूनही चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा डाग हे दिसतातच.हे डाग लपवण्यासाठी मग आणखी मेकअप केला जातो. मात्र बऱ्याचदा यामुळे मेकअप बिघडतो किंवा चेहऱ्यावर Face एक मोठा थर दिसू लागलो तसचं कालांतराने चेहरा काळवंडतो. 

चेहऱ्यावरील डागांमुळे नेमका कसा मेकअप करावा हे अनेकींना कळत नाही. मात्र काही साध्या ट्रीक्स आणि स्पेप्टच्या मदतीने हे काळे डाग लपवणं शक्य आहे. काळे डाग लपले गेले तर संपूर्ण मेकअप उठून दिसतो आणि चेहरा सुंदर दिसू लागतो. यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करणं गरजेचं आहे. Makeup tips for spotless skin

चेहऱ्यावर मेकअप करण्याआधी चेहऱा स्वच्छ धुवा. शक्य झाल्यास चेहरा बर्फाच्या गार पाण्याने धुवा. त्यानंतर चेहऱ्याला माॅइश्चराइझर लावा. तुम्ही शिमरी मॉइश्चराइझरही वापरू शकता. 

त्यानंतर चेहऱ्याला प्रायमर लावणं गरजेचं आहे. यामुळे चेहऱ्यावरील पोर्स बंद होतात आणि मेकअप जास्त काळ टिकून राहण्यास मदत होते. संपूर्ण चेहऱ्याला प्राइमर लावल्यानंतर ५ मिनिटं थांबावं.

हे देखिल वाचा-

काळ्या डागांसाठी मेकअप
Flour Face Pack : पिठाचा फेस पॅक असा बनवा घरच्या घरी, बघा कसा इस्टंट ग्लो येतो ते

यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलर करेक्टर. अनेकदा काळे डाग लपवण्यासाठी कन्सिलरचा वापर केला जातो. मात्र यामुळेही डाग मेकअपनंतरही दिसतात. यासाठीच कलर करेक्टर हे महत्वाचं आहे. कलर करेक्टर हे तुमच्या  स्किन टोन म्हणजेच त्वचेच्या रंगाचं नसून ते भगव्या किंवा काही वेळा हिरव्या रंगाचं असतं. साधारण भगव्या रंगाच्या कलर करेक्टरचा वापर करावा. चेहऱ्यावरील डागांवर तसंच डोळ्यांखाली काळी वर्तुळ असल्यास तिथे आणि ओठींभोवती असलेल्या काळ्या त्वचेवर हे भगव्या रंगाचं करेक्टर लावावं. यासाठी तुम्ही एखाद्या ऑरेंज लिपस्टिकचाही वापर करू शकता. Colour corrector for spots 

यानंतर ब्रश किंवा स्पंजच्या मदतीने कलर करेक्टर चांगल्या प्रकारे चेहऱ्यावर ब्लेंड करा. 

यानंतर कन्सिलर लावा. साधारण फाऊंडेशन लावल्यानंतर डोळ्या खाली किंवा चेहऱ्यावर कन्सिलर लावलं जातं. मात्र जर चेहऱ्यावर डाग आणि बारीक पुटकुळ्या असतील तर कलर करेक्टरनंतर कन्सिलर लावावं. हे कन्सिलरही चेहऱ्यावर ब्रश किंवा स्पंजच्या मदतीने ब्लेड करावं. 

कलर करेक्टर आणि फाऊंडेशन लावून झाल्यानंतर चेहऱ्यावर फाऊंडेशन लावावं. लिक्विड फाऊंडेशन निवडल्यास मेकअप जास्त काळ टिकून राहण्यास मदत होते. फाऊंडेशन निवडताना ते तुमच्या स्किन टोननुसार असेल याची खात्री करावी. अनेकदा चुकीचा शेड निवडल्यामुळेही मेकअप बिघडू शकतो. Make up tips foe spotless skin

फाऊंडेशन सेट झाल्यानंतर त्यावर प्रेस पावडर किंवा लूस पावडर ब्रशच्या मदतीने लावा. 

यानंतर मेकअप पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमची आवडती लिपस्टिक, आय लाईनर लावू शकता. त्याच प्रमाणे डोळ्याच्या खाली चेहऱ्याच्या उंचवट्यांवर हाय लाइटर लावल्यास अधिक ग्लो दिसण्यास मदत होते. शिवाय हाय लायटरमुळे चेहऱ्यावर हाय लायटर लावलेल्या ठिकाणी लक्ष वेधलं जातं. संपूर्ण मेकअप झाल्यानंतर तुम्ही चेहऱ्यावर मेकअप सेट स्प्रे मारू शकता. यामुळे मेकअप चिकट होणे किंवा काही काळाने पुसट होणे हे टाळता येतं आणि मेकअप जास्त काळासाठी टिकून राहतो. 

हे देखिल वाचा-

काळ्या डागांसाठी मेकअप
Beauty Tips for Face : आईशप्पथ, कसली गोरी आहेस गं!, ऐकायचं असेल तर आताच फॉलो करा या टिप्स

अशा प्रकारे मेकअप केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग दिसणार नाहित. चेहऱ्यावरील काळे डाग मेकअप मध्ये लपवण्यासाठी सगळ्यात महत्वाच्या असलेल्या गोष्टी म्हणजे ऑरेंज करेक्टर आणि कन्सिलर. करेक्टर नसल्यास आणखी एक ट्रीक वापरून तुम्ही तो डागांवर लावू शकता. साधारण प्रत्येक महिलेकडे लाल लिपस्टिक ही असतेच. अशा वेळी ही लाल लिपस्टिक थोडी हातावर लावावी. यात थोडं कन्सिलर मिसळावं किंवा फाऊंडेशनचे एक ते दोन थेंब घेतल्यास भगवा रंग तयार होईल. अशा प्रकारे तुम्ही ऑरेंज केरक्टर तयार करून त्याचा वापर मेकअप करताना करू शकता. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com