
Union Budget 2025: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदा अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जाहीर केल्यात. त्यांनी भाषणात बिहारच्या शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा केल्या. बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात आणि परदेशात माखणाची मागणी झपाट्याने वाढत आहे. तेलकट आणि गोड स्नॅक्सला पर्याय शोधणारा माखना लोक आवडीने खात आहेत. या वाढत्या मागणीमुळे उद्योजकांना मखाना व्यवसायात प्रवेश करण्याची आणि आरोग्याबाबत जागरूक करण्यासाठी मोठी संधी मिळाली आहे. मखाना सुपरफुड कसे बनले हे जाणून घेऊया.