- अश्विनी आपटे- खुर्जेकर, व्यक्तिमत्त्वविषयक सल्लागार
मैत्रिणींनो, आपण बायका दिवसभर किती जबाबदाऱ्या पार पडत असतो. अगदी सकाळी उठल्यापासून आपल्या कामांची यादी वाढतच जाते. घरच्यांसाठी चहा-नाश्ता, नवऱ्याच्या डब्याची तयारी, मुलांच्या शाळा-कॉलेजची तयारी, स्वयंपाक करणं, घराची साफसफाई, सासू-सासऱ्यांची औषधं, त्यांचं तब्येत पाणी, घरातलं वाण सामान, फळभाजी, घरातली छोटी छोटी कामं- लाइट बिल भरणं, फोन बिल भरणं, नातेवाईकांशी संबंध टिकवणं, पाहुण्यांची उठबस आणि त्यात तुम्ही नोकरी अथवा व्यवसाय करत असाल, तर त्याची कामं.