ड्रेसिंग ट्रेंड : मलायकासारखे सुंदर दिसण्यासाठी ट्राय करा हटके लूक

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 22 November 2020

सध्याच्या घडीला बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पेहराव्यावरुन बरेच ट्रेंड सेट होताना दिसतात. अनेक जणी एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीला फॉलो करतानाही पाहायला मिळते. मलायका अरोरा ही अशाच मॉडेल आयकॉनपैकी एक.

दिवाळीची झाली.. आता तुळशीची लग्न लागली की विवाह मूहुर्ताच्या तारखा निघायला सुरुवात होतील. कोरोनामुळं लांबलेली विवाह समारंभ आगामी काळातही मोजक्या मंडळींच्या उपस्थितीतच पार पडतील. पण या काळातही फॅशनचा ट्रेंड कमी होणार नाही. ड्रेसिंग सेन्स हे व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूपैकी एक अंग असते. त्यामुळेच त्यावर अधिक भर दिला जातो. महिला वर्गासाठी कोणताही कार्यक्रम एक पर्वणीच असतो. चला तर मग जाणून घेऊयात ड्रेसिंगचा ट्रेंड बद्दल... 

प्रिंटेड कुर्ती- पॅंट सेट

सध्याच्या घडीला बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पेहराव्यावरुन बरेच ट्रेंड सेट होताना दिसतात. अनेक जणी एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीला फॉलो करतानाही पाहायला मिळते. मलायका अरोरा ही अशाच मॉडेल आयकॉनपैकी एक. एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून तिला छाप सोडता आलेली नसली तरी आपल्या ड्रसिंग सेन्समुळे ती चांगलीच चर्चेत असते. सोशल मीडियावर याची चर्चा रंगते. मलायका पाश्चिमात्य वेशभूषेसह भारतीय पेहराव्यातही सर्वांचे लक्ष वेधून घेताना अनेकदा पाहायला मिळाले आहे. नुकताच मलायकाचा इंडो वेस्टर्न लुक चर्चेत आला होता. तरुणी तिचा लूक कॉपी करुन मित्र-मैत्रीणीच्या लग्नात किंवा एखाद्या खास कार्यक्रमात मिरवू शकतात.   

लाईफस्टाईलच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सोशल मीडियावर लोकप्रिय ठरलेल्या ट्रेंडीग लुकमध्ये मलायकानं सुंदर ऑक्साइड ज्वेलरी घातल्याचे दिसते. माथ्यावरील ओवरसाइज्ड बिंदी आणि त्याला सिंगल साईड पट्टी अशा लूकमध्ये मलायका अधिक खुलून दिसते. धोतर स्टाईलने नेसलेली साडी लक्षवेधून घेणारी अशीच आहे. हा लूक कॉपी करुन तरुणी नव्या स्टाईलमध्ये मिरवू शकतात.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malaika arora khan special jewellery and dress make you look good any special occasion