India's World Record Book: दहा महिन्यांचा मुलगा इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये!

India's World Record Book: मल्हारने अवघ्या तीन मिनिटांत २६ फ्लॅशकार्ड्स अचूक ओळखून स्वतःचे नाव इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंदविले.
India's World Record Book: दहा महिन्यांचा मुलगा इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये!
Sakal

तुमच्यात टॅलेंट असेल तर तुम्ही अगदी लहान वयातही तुम्ही भरारी घेऊ शकता. असाच काहीसा कारनामा नागपूरचा दहा महिन्यांचा चिमुकला मल्हार अमित महाडिक याने करून दाखविला. मल्हारने अवघ्या तीन मिनिटांत २६ फ्लॅशकार्ड्स अचूक ओळखून स्वतःचे नाव इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंदविले. असा पराक्रम करणारा मल्हार भारतातील पहिला बालक ठरला आहे.

सोमवारी क्वॉर्टर येथे राहणाऱ्या मल्हारची अलीकडेच इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डस फाउंडेशनतर्फे व्हिडीओ कॉलद्वारे परीक्षा घेण्यात आली. त्यात त्याला तीन मिनिटांत फळे व भाजीपाल्यांच्या चित्रांचा समावेश असलेले किमान २२ फ्लॅशकार्ड्स ओळखायचे होते. मल्हारने निर्धारित वेळेत २६ फ्लॅशकार्ड्स अचूकपणे ओळखून प्रतिष्ठेच्या गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सशी संबंधित असलेल्या इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदविले.

उल्लेखनीय म्हणजे, भारतात इतक्या कमी वयात आतापर्यंत कोणत्याच मुलाने असा पराक्रम केलेला नाही. मल्हारने हा अनोखा विक्रम करून नागपूर व विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Sakal
India's World Record Book: दहा महिन्यांचा मुलगा इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये!
भूकंपाचे हादरे जाणवल्यास घाबरू नका, अशी 'घ्या' खबरदारी

या विक्रमाबद्दल ‘सकाळ’शी बोलताना मल्हारची आई भाग्यश्री म्हणाली, आम्ही या विक्रमाबद्दल ऐकले होते. त्यामुळे मल्हारकडून यासंदर्भात तयारी करवून घेतली. त्याची आकलन व स्मरणशक्ती जबरदस्त असल्यामुळे त्याने अल्पावधीतच शिकविलेले आत्मसात केले. या कामगिरीबद्दल त्याला फाउंडेशनकडून प्रमाणपत्र मिळाले असून, संकेतस्थळावर नोंदही करण्यात आली आहे.

त्यामुळे आता २०२५ च्या आगामी आवृत्तीत त्याच्या नावाचा औपचारिक समावेश होणार आहे. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठीही त्याचे नाव पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. मल्हारचे वडील अमित हे सीपी क्लबमध्ये अकाऊंटंट असून, आई भाग्यश्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात क्लर्क आहे. मुलाच्या कामगिरीचा दोघांनाही आनंद व अभिमान आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com