

The Meaningful Connection of 'Breakfast'
Sakal
राजीव तांबे
म्हणजे मी मराठीप्रेमी असलो, तरी मला नाश्ता या शब्दापेक्षा ‘ब्रेकफास्ट’ हा शब्द खूप आवडतो. कारण या इंग्रजी शब्दाची फोड आणि त्यावेळची कृती यांचा अनन्यसाधारण संबंध आहे.
सकाळी शाळेत जाण्याआधी मुले ब्रेकफास्ट करत असताना किंवा मुलांकडून करवून घेत असताना, या ब्रेकफास्ट शब्दाची अनेक काँबिनेशन्स तुम्हाला पाहायला’ मिळत असतात. आणि यातूनच तुम्हाला अनेक गोष्टी समजतात. म्हणजे त्या मुलाचे आरोग्याचे प्रश्न काय असू शकतात? मुलगा आणि पालक यांचे नातेसंबंध कसे आहेत? घरात मुलांसाठी निर्भय वातावरण आहे का? मुलांच्या आवडी-निवडीचा विचार घरात केला जातो का? आणि मुख्य म्हणजे पालक मुलावर सतत ‘उपदेशांची फवारणी’ करत आहेत का?