Makeup Brush स्वच्छ कसा करायचा हा प्रश्न पडलाय? मग या टीप्स येतील कामी

तुम्ही वेळोवेळी ब्रथ किंवा ब्युटी ब्लेंडर स्वच्छ करत नसाल तर तुमच्या चेहऱ्यावर अॅलर्जी Allergy किंवा इन्फेक्शन तसंच पिंपल्स येणाची शक्यता वाढते. यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही ब्रश आणि ब्युटी ब्लेंडर स्वच्छ ठेवू शकता
Makeup Brush स्वच्छ कसा करायचा हा प्रश्न पडलाय? मग या टीप्स येतील कामी

मुली किंवा एकंदर महिला वर्गाला नटण्या थटण्याची मोठी हौस असते. खास करून मेकअप करण्यासाठी महिलांना किंवा मुलींना कोणत्याही निमित्ताची आवश्यकता नसते. अलिकडे तर डेलीवेअर मेकअप, ब्रायडल मेकअप, ऑफिस मेकअप किंवा कॉलेज किंवा साध्या भेटी गाठींसाठी सिंपल मेकअप असे मेकअपचे Makeup वेगवेगळे प्रकार आणि ट्रेंड Trends पाहायला मिळत आहेत. Marathi Hygiene tips how to keep your makeup brush clean

सोशल मीडियावरही Social Media मेकअपच्या विविध ट्यूटोरियल चांगल्याच व्हायरल होतात. या रिल्सच्या मदतीने कमीत कमी प्रोडक्टमध्ये झटपट मेकअप Makeup करणं अनेक जणी शिकल्या असतील. कोणताही मेकअप करत असताना साधारणपणे पावडर आणि कंन्सिलर किंवा फाऊंडेशनचा मुख्य वापर केला जातो.

मेकअप करत असताना सुंदर दिसण्यासोबतच त्वचेची काळजी घेणं Skin Careअत्यंत गरजेचं आहे. अनेकजणी मेकअपसाठी चांगल्या प्रतीचे किंवा ब्रॅण्डचे प्रोडक्ट वापरतात. चेहऱ्यासाठी लावण्यात येणाऱ्या पावडर आणि कंन्सिलरसोबतच ते लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्रशची स्वच्छता राखणं अत्यंत गरजेचं आहे.

तुम्ही वेळोवेळी ब्रथ किंवा ब्युटी ब्लेंडर स्वच्छ करत नसाल तर तुमच्या चेहऱ्यावर अॅलर्जी Alergy किंवा इन्फेक्शन तसंच पिंपल्स येणाची शक्यता वाढते. यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही ब्रश आणि ब्युटी ब्लेंडर स्वच्छ ठेवू शकता.

असे स्वच्छ करा मेकअप ब्रश आणि ब्यूटी ब्लेंडर

जर तुम्ही दररोज मेकअप करत असाल तर किमान दर आठवड्याला ब्रश स्वच्छ करणं गरजेचं आहे. तसंच जर तुम्हाला घाम येत असेल किंवा तुमची त्वचा तेलकट असेल आणि तुम्ही दिवसातून १-२ वेळा मेकअप ब्रश आणि ब्लेंडर वापरत असाल तर तुम्ही तर दोन दिवसांनी थेट वाहत्या पाण्याखाली ब्रश धुवू शकता.

Makeup ब्रश आणि ब्यूटी ब्लेंडर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही घरातील एखाद्या सौम्य शॅम्पूचा वापर करू शकता. यासाठी एका खोलगट भांड्यात पाणी घ्या त्यात १ चमचा शॅम्पू टाका. या मिश्रणात ब्रश आणि ब्युटी ब्लेंडर १० मिनिटांसाठी पाण्यात राहू द्या. त्यानंतर वाहत्या पाण्याखाली हलक्या हाताने ब्रश स्वच्छ धुवा.

हे देखिल वाचा-

Makeup Brush स्वच्छ कसा करायचा हा प्रश्न पडलाय? मग या टीप्स येतील कामी
HD Makeup : ब्राईडसाठी परफेक्ट असणारा HD मेकअप काय आहे? याचे प्रमुख प्रकार घ्या जाणून

मेकअप ब्रश आणि ब्युटी ब्लेंडर स्वच्छ करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात कोमट पाणी घ्या. यामध्ये १ चमचा शॅम्पू आणि बेकिंग सोडा टाकून या मिश्रणात अर्धा तासासाठी ब्रश आणि ब्लेंडर भिजत ठेवा. त्यानंतर ३-४ वेळा स्वच्छ पाण्याने ते धुवा.

मेकअप ब्रश स्वच्छ करण्यासाठी एका ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या. यामध्ये १ चमचा लिक्विड डिटर्जंट आणि १ चमचा व्हाइट विनेगर टाका. आता या मिश्रणामध्ये ब्रश आणि ब्यूटी ब्लेंडर २० मिनिटांसाठी राहू द्या. त्यानंतर नळाखाली ब्रश आणि ब्लेंडर स्वच्छ धुवा.

स्वच्छ केलेल्या Makeup brush आणि ब्यूटी ब्रेंडरची अशी घ्या काळजी

ब्रश आणि ब्युटी ब्लेंडर धुवून झाल्यानंतर ते टिश्यू पेपरच्या मदतीने कोरडे करा. त्यानंतर पंख्याखाली किंवा हवेवर ते पूर्णपणे कोरडे होवू द्या. त्यानंतरच त्याचा वापर करा. मेकअप ब्रश आणि ब्युटी ब्लेंडर ठेवण्यासाठी कायम एखादं वेगळं पाऊच वापरा किंवा तुमच्या मेकअप किटच्या एखाद्या वेगळ्या कप्प्यामध्ये ते ठेवा जेणे करून ते स्वच्छ राहतील.

तसंच ब्रश किंवा ब्लेंडरचा वापर केल्यानंतर जर लगेचच ते टिश्यू पेपरने पुसले तर जास्त काळ स्वच्छ राहण्यास मदत होते. अशा प्रकारे नियमित मेकअप ब्रश आणि ब्युटी ब्लेंडर स्वच्छ ठेवत असाल तर दररोज मेकअप करूनही तुमची त्वचा चांगली राहण्यास मदत होईल.

हे देखिल वाचा-

Makeup Brush स्वच्छ कसा करायचा हा प्रश्न पडलाय? मग या टीप्स येतील कामी
Makeup Tips : आहे त्या वयापेक्षा दिसाल जास्त तरुण, त्यासाठी फक्त हा मेकअप रूटीन फॉलो करा

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com