Driving Tips: ड्रायव्हिंग करत असताना या गोष्टींची घ्या काळजी, धोका टळेल

ड्रायव्हिंग करत असताना अनेकजण काही छोट्या-मोठ्या चुका करत असतात किंवा निष्काळजी पणा करतात. ज्यामुळे इतरांना देखील त्याचा त्रास होवू शकतो. तसचं सुरक्षेच्या Security दृष्टीने या चुका टाळणं अत्यंत गरजेचं आहे
Safe Driving Tips in Marathi
Safe Driving Tips in MarathiEsakal

Safe Driving Tips: ड्रायव्हिंग म्हणजेच गाडी चालवणं बहुतेकजण सहज शिकतात. अनेकजण ड्रायव्हिंग क्लासमध्ये ड्रायव्हिंगचं प्रशिक्षण घेतात. तर काही कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून किंवा मित्र-मैत्रिणींकडून गाडी चालवणं शिकतात. Marathi Tips for Safe and Secure Driving Skills

गाडी चालवणं शिकल्यानंतर Driving तसचं ड्रायव्हिंगच्या नियमांची माहिती घेतल्यानंतरही काळजीपूर्वक आणि मन शांत आणि एकाग्र Concentration ठेवून गाडी चालवणं जास्त गरजेचं आहे. कारण ड्रायव्हिंग करताना झालेली एक छोटीशी चूकही तुमच्या किंवा इतरांच्या जीवावर बेतू शकते.

ड्रायव्हिंग करत असताना अनेकजण काही छोट्या-मोठ्या चुका करत असतात किंवा निष्काळजी पणा करतात. ज्यामुळे इतरांना देखील त्याचा त्रास होवू शकतो. तसचं सुरक्षेच्या Security दृष्टीने या चुका टाळणं अत्यंत गरजेचं आहे. ड्रायव्हिंग करत असताना सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी टाळाव्या याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. सतत लेन बदलू नका- काहीजणांना ड्रायव्हिंग करत असताना सतत लेन बदलण्याची सवय असते. यामुळे रस्त्यावरील इतर चालकांना त्रास होवू शकतो तसचं यामुळे अपघात होण्याचा धोका देखील वाढतो. यासाठी एक लेन पाळण्याचा प्रयत्न करा.

२. सुरक्षित अंतर राखा- इतर गाड्यांचा पाठलाग करणं किंवा इतर वाहनाच्या अगदी जवळून गाडी चालवणं धोकादायक ठरू शकतं. यासाठी सुरक्षित अंतर राखणं गरजेचं आहे. खास करून खराब म्हणजेच ढगाळ, धुकं असताना किंवा पाऊस पडत असताना समोरच्या गाडीपासून योग्य अंतर किंबहूना थोड जास्त अंतर राखून गाडी चालवणं गरजेचं आहे.

या सोबतच अवजड वाहनं म्हणजेच ट्रक किंवा कंटेनर यासोबतच टू-व्हिलर पासूनही सुरक्षित अंतर राखणं गरजेचं आहे.

हे देखिल वाचा-

Safe Driving Tips in Marathi
Driving Tips For Monsoon : या गोष्टी लक्षात ठेऊनच पावसाळ्यात ड्रायव्हिंगसाठी बाहेर पडा, नाहीतर...

३. सिग्नल न देताच अचानक गाडी थांबनू नका- काही प्रसंग असे असतात जेव्हा अनेकजण अचानक गाडी थांबवतात. या प्रसंगांमध्ये अनेकदा सिग्नल देणं काहीजण विसरतात, ज्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते.

काही वेळा रस्त्यावर अचानक तुम्हाला एखादं दुकान दिसल्यास किंवा एखादी व्यक्ती तसचं पार्किंगसाठी मोकळी जागा दिसल्यास काहीजण गाडी थांबवतात.

अशावेळी मागच्या वाहनाला इंडिकेट करणं म्हणजेच सूचना देणं गरजेचं आहे. अचानक गाडी थांबवण्याएवडी स्पी़ड कमी करून इंडिकेटर देत गाडी थांबवा. यामुळे मागील वाहन त्याच्या गाडीचा स्पीड योग्य राखेल आणि मार्ग बदलेल.

Safe Driving Tips in Marathi
Driving Tips : रात्रीच्या वेळी गाडीला अपघात होण्याचा जास्त धोका? या 5 Technique येतील कामी

४. लक्ष विचलित होवू देऊ नका- वाहन चालवताना लक्ष विचलित होणं हे अपघात होण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारणं आहे. अनेकदा वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं किंवा मोबाईल हाताळणं महागात पडू शकतं.

त्याचसोबत गाडीतील इन्फोटेंमेंट स्क्रिनकडे जास्त लक्ष दिल्यामुळेही धोका वाढू शकतो. काहीवेळेस आपला गाडीवर पूर्ण ताबा आहे. तसचं रस्ता परिचित आहे या समजात अनेकजण निर्धास्तपणे गाडी चालवतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते.

५. वाहन चालण्यासाठी बसण्याची योग्य स्थिती- वाहन चालवण्यासाठी तुम्ही कोणत्या स्थितीमध्ये बसला आहात हे अत्यंत गरजेचं आहे.

सीट आणि स्टेअरिंग तसंच ब्रेक आणि अॅक्सिलेटर यात योग्य अंतंर असणं गरजेचं आहे. सीट जास्त मागे नसावी जेणेकरून तुम्हाला ब्रेक आणि एक्सिलेटर पर्यंत पाय पोहचण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

तसंच जर तुम्ही जास्त तास ड्रायव्हिंग करणार असाल तर याचा परिणाम तुमच्या पोश्चरवर म्हणजेच बसण्याच्या स्थितीवर होऊ शकतो. यासाठी दुरच्या प्रवासात दर काही तासांनी उठून शरीराला आराम द्या. हाता पायांची स्ट्रेचिंग करा.

ड्रायव्हिंग करत असचाना समय सूचकता बाळगणं तसचं लक्ष विचलित होवू न देता गाडी चालवल्याने धोके टळू शकतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com