Car Driving Tips : A एक्सीलेटर, B ब्रेक, C क्लच, D कशासाठी? कारची ABCD शिकून घ्या

जेव्हा तुम्ही कार चालवायला शिकायला जाता तेव्हा प्रशिक्षक तुम्हाला कारची संपूर्ण ABCD समजावून सांगतात
Car Driving Tips
Car Driving Tipsesakal

Car Driving Tips : जेव्हा तुम्ही कार चालवायला शिकायला जाता तेव्हा प्रशिक्षक तुम्हाला कारची संपूर्ण ABCD समजावून सांगतात. तुम्हाला कारबद्दल काहीही माहिती नसली तरीही तुम्ही कारच्या एबीसीडीबद्दल अनेकदा ऐकले असेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की कारच्या A, B, C, D मध्ये A एस्केलेटर, B मध्ये ब्रेक आणि C मध्ये क्लच पण D काय असतं ?

Car Driving Tips
Garlic Health Benefits: सकाळी रिकाम्या पोटी मध आणि लसूण खाण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे

कारच्या डी फंक्शनबद्दल कोणीही तुम्हाला सांगू शकत नाही कारण बहुतेक लोकांना माहित नाही की कारच्या A, B, C, D मध्ये D चे काम काय असतं? जेव्हा तुम्ही कार ड्रायव्हिंग शिकता, तेव्हा कार ड्रायव्हिंगच्या काही मूलभूत गोष्टी आहेत ज्या तुम्हाला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

Car Driving Tips
Pot Water Tips: माठातलं पाणी नक्की प्या मात्र या चूका टाळा नाहीतर काही खरं नाही

त्यात A फॉर एक्सीलरेटर पॅडल, B फॉर ब्रेक पॅडल, C फॉर क्लच पॅडल आणि D फॉर डेड पॅडल आहे. हे सर्वजण कारमध्ये वेगवेगळी कामे करतात. बर्‍याच लोकांना A, B आणि C बद्दल माहिती असते परंतु बर्‍याचदा लोकांना (D- Dead Pedal) बद्दल माहिती नसते.

Car Driving Tips
Women Health : कोरफडीमुळे महिलांना होतात हे फायदे

कारमधील डेड पेडलच्या नावावरूनच स्पष्ट होते की डेड म्हणजे ज्याला कोणतेही काम नाही. म्हणजेच कारमध्ये कोणतेही काम नाही. परंतु तो तुमच्या आरामासाठी नक्कीच उपयोगी आहे. जर तुम्ही त्यावर तुमचा डावा पाय ठेवलात तर तुमच्या त्या पायाला आराम मिळेल.

Car Driving Tips
Pregnancy Tips : तिशीनंतर गर्भधारणेत येतात या अडचणी

नावाप्रमाणेच हा डेड आहे. परंतु, प्रत्यक्षात त्याचे एक उत्कृष्ट कार्य आहे, आपण त्यावर आपला डावा पाय विश्रांतीसाठी ठेवू शकता. वास्तविक, गाडी चालवताना डाव्या पायाचा फारसा उपयोग होत नाही. क्लच दाबण्यासाठी आणि सोडण्यासाठी तुम्ही डावा पाय वापरता.

Car Driving Tips
Women Health : कोरफडीमुळे महिलांना होतात हे फायदे

जेव्हा तुम्हाला गीअर शिफ्ट करावा लागतो, तेव्हा पायाला आराम देण्यासाठी काही कारमध्ये सामान्यतः असे पेडल दिले जाते. डेड पॅडल तुमच्या कारमध्ये क्लच पॅडलच्या डाव्या बाजूला असतो.

Car Driving Tips
Amazon Sale : इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मिळतोय खूप मोठा डिस्काउंट, आजचा शेवटचा दिवस

कार (A) मध्ये कारला स्पीड देण्यासाठी एक्सलेटर पेडल वापरले जाते, B हा ब्रेक पेडल कार थांबवण्यासाठी दिला जातो. हे दोन्ही पॅडल वापरण्यासाठी चालकाला त्याचा उजवा पाय वापरावा लागतो. याशिवाय गाडी चालवताना गीअर बदलण्यासाठी क्लच पेडलचा वापर केला जातो, त्यासाठी डाव्या पायाचा वापर केला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com